जिवाच्या आकांताने ओरडला, पाठ काळीनिळी झाली, तरी सोडलं नाही, तरुणाला 22 मिनिटं नॉनस्टॉप मारहाण

Last Updated:

Crime in Dharashiv : धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या कामाविरोधात तक्रार करून उपोषण केल्याच्या रागातून पवनचक्की कंपनीच्या गुंडांनी या तरुण शेतकऱ्याला जबर मारहाण केली आहे.

Ai Generated Photo
Ai Generated Photo
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव: मागील वर्षी बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात पवनचक्कीच्या वादातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. हत्येची ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले होते. बीडच्या या घटनेची आता धाराशिवमध्ये पुनरावृत्ती घडली आहे. धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यात एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे.
पवनचक्कीच्या कामाविरोधात तक्रार करून उपोषण केल्याच्या रागातून पवनचक्की कंपनीच्या गुंडांनी या तरुण शेतकऱ्याला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत संबंधित शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बजरंग कोळेकर (रा. घाटनांदुर, ता. भूम) असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, पवनचक्कीच्या कामाविरोधात तक्रारी केल्याचा राग मनात धरून काही गुंडांनी त्याला हॉकी स्टिकने तब्बल 22 मिनिटे मारहाण केली. यापूर्वी देखील कामाबद्दल तक्रार केल्याने त्याला 'बघून घेतो' अशी धमकी देण्यात आली होती, असेही त्याने सांगितले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच भूम पोलिसांनी जखमी बजरंग कोळेकर यांची रुग्णालयात जाऊन पाहणी केली. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनेमागील नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मारहाणीमुळे बजरंग कोळेकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
जिवाच्या आकांताने ओरडला, पाठ काळीनिळी झाली, तरी सोडलं नाही, तरुणाला 22 मिनिटं नॉनस्टॉप मारहाण
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement