advertisement

रोज सकाळी उपाशी पोटी खा 1 चमचा तूप; मिळतील ‘हे’ फायदे Video

Last Updated:

उपाशीपोटी रोज एक चमचा तूप खाल्लं तर त्या तुपाचे शरीरासाठी भरपूर असे फायदे आहेत. हे फायदे कोण कोणते आहेत? पाहा

+
News18

News18

अपूर्वा तळणीकर,प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीनगर : जेवणाची चव वाढवण्यासाठी तूप वापरलं जात. मात्र अनेक जण तुपामुळे वजन वाढेल म्हणून खाणे टाळतात. पण तुम्हाला माहिती आहे का उपाशीपोटी रोज एक चमचा तूप खाल्लं तर त्या तुपाचे शरीरासाठी भरपूर असे फायदे आहेत. हे फायदे कोण कोणते आहेत? याबद्दच छत्रपती संभाजीनगर शहरातील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
advertisement
काय आहेत फायदे?
एक चमचा तूप म्हणजे पाच मिली ग्रॅम तूप हे प्रत्येकाने दररोज खायलाच पाहिजे. रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा तूप खाल्ल्याने आपली पचन संस्था चांगली होते. त्यासोबतच सकाळी पोट साफ व्हायला देखील मदत होते. शरीरातील जे निष्क्रिय घटक आहेत ते युरिनद्वारे बाहेर काढायला मदत करते. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपलं सौंदर्य वाढवायला तूप अतिशय मदत करते. आपल्या शरीरातील जेवढे काही हार्मोन्स आहेत. या हार्मोन्स सेक्रेशनसाठी लुब्रिकंट म्हणून मदत करते. हाडांसाठी ही तूप अतिशय चांगलं असतं. आणि उपाशी पोटी खाल्लेतर ते अजूनच फायदेशीर ठरतं, असं अलका कर्णिक सांगतात.
advertisement
केसांच्या सौंदर्यापासून सांधेदुखीपर्यंत अत्यंत गुणकारी तेल, त्वचाही होते तजेलदार
केसांसाठीही तूप उपाशीपोटी खाल्लेलं अतिशय चांगले असतं. आपले केस वाढवायला मदत करते. तुपामध्ये व्हिटॅमिन अ, ब, ई, क हे घटक असल्यामुळे हे सर्व घटक आपल्या शरीरातील सर्वच संस्थांना अतिशय गरजेचे आहेत. जर तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा तूप खात असाल तर ते तूप खाऊन नुसतं बसायचं नाही. तर त्यानंतर कमीत कमी तुम्ही 30 ते 40 मिनिटे तुमचा वर्कआऊट हा करायलाच पाहिजे. यामुळे आजून चांगला परिणाम हा होतो.
advertisement
व्यसनमुक्तीसाठी करताय प्रयत्न? उपाय घरातच! बिया बारीक पण प्रचंड गुणकारी
किंवा जर तुम्ही गरम पाण्याबरोबर एक चमचा तूप घेतलं आणि त्यानंतर जर वर्कआउट केलं तर शरीरातील सर्व संस्था या क्रियाशील होतात. पण एक दिवस घेऊन चालणार नाही तर ते तुम्ही सातत्याने तीन ते चार महिने जर घेतलं तर याचे दीर्घायुष्य चांगले परिणामी आपल्या शरीरावरती होतात, असंही अलका कर्णिक सांगतात.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
रोज सकाळी उपाशी पोटी खा 1 चमचा तूप; मिळतील ‘हे’ फायदे Video
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement