Winter Health Tips : हिवाळ्यात तहान कमी लागते? करू नका दुर्लक्ष, नाहीतर होईल हा त्रास
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
थंडीमुळे तहान कमी लागणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी, याकडे दुर्लक्ष करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या दिवसांत कमी पाणी प्यायल्यास डिहायड्रेशन आणि किडनीशी संबंधित समस्या वाढू शकतात.
छत्रपती संभाजीनगर : कडाक्याची थंडी सुरू झाली आहे आणि या काळात आपण अनेकदा एक गोष्ट विसरतो, ती म्हणजे पुरेसं पाणी पिणे. थंडीमुळे तहान कमी लागणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी, याकडे दुर्लक्ष करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या दिवसांत कमी पाणी प्यायल्यास डिहायड्रेशन आणि किडनीशी संबंधित समस्या वाढू शकतात.
थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्ताचा दाब थोडा वाढतो. शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित ठेवण्यासाठी किडनी जास्त लघवी तयार करते. परिणामी, वारंवार लघवीला जावे लागते आणि शरीरातील पाण्याचा साठा कमी होतो. या स्थितीला कोल्ड डाययुरेसीस असे म्हणतात.
advertisement
बदललेला तहान सिग्नल: थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावल्याने, मेंदूला शरीरात पाण्याची कमतरता असल्याचा योग्य सिग्नल मिळत नाही. त्यामुळे आपल्याला तहान लागल्याची जाणीव कमी होते.
श्वासावाटे होणारा पाण्याचा निचरा: थंड आणि कोरडी हवा श्वास घेताना आत घेतली जाते आणि ती गरम, दमट होऊन बाहेर पडते. या प्रक्रियेतही नकळतपणे पाण्याची वाफ शरीराबाहेर पडते, ज्यामुळे शरीरातील आर्द्रता कमी होते. कमी पाणी प्यायल्यास रक्ताचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा मंदावतो. परिणामी दिवसभर थकवा जाणवतो आणि कामात लक्ष लागत नाही.
advertisement
त्वचा आणि ओठ कोरडे पडणे: हिवाळ्यात त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी होते. त्यातच पाण्याची कमतरता झाल्यास त्वचा आणि ओठ आणखी फाटतात, तसेच खाज सुटण्याची समस्या वाढते.
बद्धकोष्ठता: पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास आतड्यांमध्ये मल कडक होतो. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास वाढतो. शरीरातील विषारी घटक पाण्याद्वारे बाहेर पडतात. कमी पाणी प्यायल्यास, हे विषारी घटक किडनीमध्ये जमा होऊ लागतात, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो.
advertisement
हिवाळ्यातही प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान अडीच ते तीन लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. वेळेचे नियोजन: फक्त तहान लागल्यावरच नाही, तर दर तासाला एक ग्लास पाणी पिण्याचा नियम करा. यासाठी तुम्ही मोबाईलवर रिमाइंडर सेट करू शकता. साध्या पाण्याऐवजी, तुम्ही गरम हर्बल टी, आले-पाणी, लिंबू पाणी किंवा सूप यांचा आहारात समावेश करू शकता.
advertisement
यामुळे शरीराला उष्णता आणि पाणी दोन्ही मिळतात. पाणी जास्त असणारी फळे आणि भाज्या खाव्यात. संत्री, स्ट्रॉबेरी, काकडी आणि टोमॅटो. पाण्याची बाटली नेहमी आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा दृष्टीसमोर ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते वारंवार आठवत राहील.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 29, 2025 3:00 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Winter Health Tips : हिवाळ्यात तहान कमी लागते? करू नका दुर्लक्ष, नाहीतर होईल हा त्रास








