Monsoon Tips: पावसाळ्यात भिजल्यानंतर आजार होण्याचा धोका, वेळीच घ्या ही खबरदारी, राहाल आजरांपासून दूर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पावसाळा सुरू होताच अनेकांना निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्याची ओढ लागते. मात्र, या आनंदाच्या क्षणांमध्ये आरोग्याचे भान ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
पुणे : पावसाळा सुरू होताच अनेकांना निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्याची ओढ लागते. धरणे, नद्या, तलाव आणि स्विमिंग पूलमध्ये भिजण्याची मजा काही औरच असते. मात्र, या आनंदाच्या क्षणांमध्ये आरोग्याचे भान ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. अशा ठिकाणी असणारे पाणी अनेकदा अशुद्ध आणि संसर्गजन्य घटकांनी भरलेले असते, ज्यामुळे विविध आजार होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे फिरायला गेल्यावर अश्या वेळी कशी काळजी घेतली पाहिजे? याविषयीच डॉ. अविनाश भोंडवे यांनी माहिती दिली आहे.
डॉ. अविनाश भोंडवे सांगतात की, धरणे, नद्या, तलाव अशा ठिकाणी साचलेले पाणी स्वच्छ नसते. या पाण्यात भिजल्याने त्वचेचे विकार, डोळ्यांचे संसर्ग, श्वसनाचे त्रास, तसेच पचनसंस्थेशी संबंधित समस्याही होऊ शकतात. विशेषतः ज्यांना दम्याचा त्रास आहे किंवा दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होत असेल, त्यांनी अशा ठिकाणी भिजणे टाळलेले उत्तम. कारण पावसामुळे तापमानात होणारा बदल आणि ओलसर हवामानामुळे हे त्रास अधिक वाढू शकतात.
advertisement
जर या ठिकाणी भिजलातच, तर लगेच अंग कोरडे करणे अत्यंत आवश्यक आहे. ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नयेत. त्याचप्रमाणे, अशा ठिकाणी फिरताना मिळणारे खाद्यपदार्थ आणि पाणी हे अनेकदा अशुद्ध असते. त्यामुळे टायफॉइड, कावीळ, उलट्या-जुलाब यांसारख्या पचनसंस्थेशी संबंधित आजारांची शक्यता वाढते.
advertisement
पावसाळ्यात पाण्याचा आनंद घ्यायचा असला तरी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. भिजल्यानंतर गरम पाण्याने स्नान, कोरडे कपडे, आणि शक्य असल्यास गरम पेये घेणे यामुळे त्रास टाळता येतो. कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, असं डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 06, 2025 10:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Monsoon Tips: पावसाळ्यात भिजल्यानंतर आजार होण्याचा धोका, वेळीच घ्या ही खबरदारी, राहाल आजरांपासून दूर