Health Tips: हार्मोनल असंतुलनामुळे शरीरारावर विविध परिणाम, संतुलित राहण्यासाठी करा हे उपाय, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
हार्मोनल असंतुलन म्हणजे शरीरातील हार्मोन्सची पातळी प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी असणे. हे असंतुलन शरीराच्या कार्यांवर परिणाम करते आणि त्यामुळे महिलांना वेगवेगळ्या विविध समस्यांना सामोरं जावं लागत.
ठाणे: अलीकडच्या काळात महिलांमध्ये आरोग्य विषयीच्या अनेक समस्या आढळून येतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातल्या त्यात शंभर पैकी 70 टक्के महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनची समस्या जाणवते.
हार्मोनल असंतुलन म्हणजे शरीरातील हार्मोन्सची पातळी प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी असणे. हे असंतुलन शरीराच्या कार्यांवर परिणाम करते आणि त्यामुळे महिलांना वेगवेगळ्या विविध समस्यांना सामोरं जावं लागत. हार्मोन्स संतुलित राहावे यासाठी कोणकोणते आसन करावे? याविषयी योगा प्रशिक्षक यांनी माहिती दिली आहे.
योगा प्रशिक्षक भीमराज कराळे सांगतात की, आजकालच्या अनेक महिलांना मासिक पाळी, वजन वाढणं, केस गळती, त्वचेवर पुळ्या येणे, मूड स्विंग, थकवा येणं अशा अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. हे सर्व शरीरातील हार्मोन्स असंतुलित असल्यामुळे होतं. हार्मोन संतुलित करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय देखील आहेत,असं ते सांगतात.
advertisement
योगा तसेच योग्य आहार घेऊन तुम्ही आपल्या हार्मोन संतुलित करू शकता. यासाठी तुम्ही काही प्राणायाम करणं गरजेचं आहे. यात प्रामुख्यानं ब्राह्मरी प्राणायाम करणं अत्यंत गरजेचे आहे. तसेच तुम्ही अनुलोम विलोम देखील करू शकता.
याविषयी सांगताना ते पुढे म्हणतात की, बुद्धकोणा आसन, सेतू आसन, सर्वांग आसन, तसेच बलासन देखील करू शकता. या सर्वांचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.
advertisement
आहार कसा घ्यावा?
दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या आहारामध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत. तसेच बदाम, अक्रोड, फायबर युक्त पदार्थ या सगळ्यांचा समावेश आपल्या आहारात करायला पाहिजे. तसेच सफरचंद, केळी, संत्री, डाळिंब अशा प्रकारची फळ देखील खावीत. योग्य आहार हा प्रत्येक आजारावरचा एक जालीम उपाय असतो, असं देखील ते सांगतात. तसेच दररोज तीन ते चार लिटर पाणी पिणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
योग्य व्यायाम, योग्य आहार तुम्हाला या आजारातून बरे करण्यासाठी मदत करेल. आणि आरोग्य विषयीच्या कुठल्याही समस्या तुम्हाला भविष्यात उद्भवणार नाहीत, असं देखील त्यांनी म्हटलं आहे
Location :
Thane,Maharashtra
First Published :
July 20, 2025 10:35 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: हार्मोनल असंतुलनामुळे शरीरारावर विविध परिणाम, संतुलित राहण्यासाठी करा हे उपाय, Video