बायकोसाठी दिवाळी टीप; घरीच तयार करा सुगंधी उटणं, नवरा ही करेल तोंड भरुन कौतूक

Last Updated:

भारतीय संस्कृतीत, पहिल्या अंघोळीला उटणं लावण्याची परंपरा शुद्धता, आरोग्य आणि सौंदर्य यांचे प्रतीक मानली जाते. उटणं लावल्याने त्वचेला पोषण मिळते, अनावश्यक केस कमी होतात, आणि त्वचा मऊ आणि तजेलदार बनते. याशिवाय, उटणाच्या नैसर्गिक सुगंधामुळे मन प्रसन्न राहते.

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई : दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव किंवा सण म्हणून ओळखला जातो आणि ते खरं देखील आहे. पण तो फक्त प्रकाशाचा उत्सव नाही, तर स्वच्छता, आरोग्य आणि त्वचेसाठी देखील महत्वाचा सण आहे. पहिल्या अंघोळीला उटणं लावण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विशेषतः दिवाळीच्या सणाच्या वेळी, पहिल्या अंघोळीला उटणं लावण्याची परंपरा घराघरात पाळली जाते. हे केवळ स्वच्छतेसाठीच नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धतेसाठी देखील महत्त्वपूर्ण मानले जाते.
भारतीय संस्कृतीत, पहिल्या अंघोळीला उटणं लावण्याची परंपरा शुद्धता, आरोग्य आणि सौंदर्य यांचे प्रतीक मानली जाते. उटणं लावल्याने त्वचेला पोषण मिळते, अनावश्यक केस कमी होतात, आणि त्वचा मऊ आणि तजेलदार बनते. याशिवाय, उटणाच्या नैसर्गिक सुगंधामुळे मन प्रसन्न राहते.
पण अनेक लोक बाहेरुन उटणं आणून लावतात. जे कधीकधी चेहरा किंवा स्कीनसाठी धोक्याचं ठरतं. पण आता काळजी करण्याची गरज नाही तुम्ही घरच्या घरी देखील काही मोजके साहित्य वापरुन सुगंधीत उटण तयार करु शकता.
advertisement
घरच्या घरी उटण बनवण्यासाठी साहित्य:
बेसन – 2 चमचे
बदाम पूड –1 चमचा
हळद पावडर – 1/2 चमचा
गुलाबजल – आवश्यकतेनुसार
दूध – 1 चमचा (ऐच्छिक, त्वचेला पोषणासाठी)
कपूर – 1-2 थेंब
कृती:
सर्व कोरडे साहित्य (बेसन, बदाम पूड, हळद) एका बाउलमध्ये नीट मिसळा.
हळूहळू गुलाबजल आणि दूध घालून घट्ट पेस्ट तयार करा.
advertisement
पेस्ट हळुवार हाताने किंवा ब्रशने चेहरा, हात, पाय यावर लावा.
10-15 मिनिटे उटण शरीरावर राहू द्या.
नंतर हळूहळू पाणी वापरून धुवून टाका.
हे घरगुती उटण सोपं, नैसर्गिक आणि स्वस्त आहे आणि दिवाळीच्या पहिल्या स्नानाला एक विशेष पारंपरिक अनुभव देतं. तुम्हीयामध्ये नारळाचं दुध देखील वापरु शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
बायकोसाठी दिवाळी टीप; घरीच तयार करा सुगंधी उटणं, नवरा ही करेल तोंड भरुन कौतूक
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement