गणपती विसर्जनानंतर पाय दुखतायत? हे 5 घरगुती उपाय देतील लगेच आराम

Last Updated:

पायात वेदना, सूज किंवा थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. अशा वेळी औषधांपेक्षा घरच्या घरी करता येणारे सोपे उपाय अधिक परिणामकारक ठरू शकतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतच्या काळात लोक खूपच उत्साही असतात. हा काळ उत्साह, नृत्य आणि जल्लोषाने भरलेला असतो. त्यात विसर्जनाच्या मिरवणुकीत तर अनेकजण तासन्‌तास उभे राहतात, चालतात आणि नाचतात. त्यामुळे पायात वेदना, सूज किंवा थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. अशा वेळी औषधांपेक्षा घरच्या घरी करता येणारे सोपे उपाय अधिक परिणामकारक ठरू शकतात.
अशावेळी काय कराल?
एक टब कोमट पाण्याने भरा आणि त्यात थोडं मीठ (रॉक सॉल्ट/सेंधा मीठ) टाका. पाय 15-20 मिनिटे त्यात ठेवा. हे रक्ताभिसरण सुधारते आणि सूज कमी करते.
हळदीचा लेप लावा
हळद नैसर्गिक वेदनाशामक आहे. हळदीत थोडं खोबरेल तेल किंवा सरसों तेल मिसळून पाया दुखण्याच्या जागी लावा आणि काही वेळ तसेच ठेवा.
advertisement
तिळाच्या तेलाने मालिश
तिळाचं तेल किंचित गरम करून हलक्या हाताने पायावर मालिश करा. यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो आणि आराम मिळतो.
पाय वर उचलून ठेवणे
पायातील रक्तदाब कमी करण्यासाठी झोपताना पायाखाली उशी ठेवा. यामुळे सूज कमी होते.
आल्याचा चहा किंवा हळदीचे दूध
आल्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. आल्याचा चहा किंवा हळदीचे दूध घेतल्याने आतील वेदना कमी होतात.
advertisement
पाय दुखणे ही तात्पुरती समस्या असते, पण ती वाढू नये यासाठी पुरेशी विश्रांती, हलकी स्ट्रेचिंग आणि पुरेसं पाणी पिणंही महत्त्वाचं आहे. काही दिवसांत वेदना कमी झाली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
गणपती विसर्जनानंतर पाय दुखतायत? हे 5 घरगुती उपाय देतील लगेच आराम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement