Pregnancy Test Fact : अल्ट्रासाउंड मशीन नव्हतं तेव्हा हजारो वर्षांपूर्वी कशी व्हायची प्रेग्नेन्सी टेस्ट? ही पद्धत क्वचितच कोणाला माहित
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्याकाळी ना प्रेग्नेंसी किट होत्या ना अल्ट्रासाऊंड मशीन तेव्हा लोक कसं ओळखायचे की एखादी स्त्री गर्भवती आहे की नाही? विचार करा हजारो वर्षांपूर्वी लोक काय करत असतील?
मुंबई : आताच्या काळात आपण प्रेग्नेंट आहोत की नाही हे पाहण्यासाठी महिला लगेच मेडिकलमधून प्रेग्नेन्सी टेस्ट करतात. यामुळे काही मिनिटातच गर्भधारणा झाली की नाही हे समजतं. यामध्ये काही शंका राहिलीच, तर सोनोग्राफी म्हणजेच अल्ट्रासाऊंडद्वारे सगळं स्पष्ट होतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्याकाळी ना प्रेग्नेंसी किट होत्या ना अल्ट्रासाऊंड मशीन तेव्हा लोक कसं ओळखायचे की एखादी स्त्री गर्भवती आहे की नाही? विचार करा हजारो वर्षांपूर्वी लोक काय करत असतील?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे की हजारो वर्षांपूर्वीही होतं प्रेग्नेंसी टेस्टिंग किट. हे ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल पण हे खरंय! प्राचीन इजिप्तमध्ये स्त्री गर्भवती आहे की नाही, हे जौ किंवा गव्हाच्या दाण्यांनी तपासलं जायचं. New Kingdom Era (1500 ते 1300 ईसा पूर्व) या काळातील लेखी दस्तऐवजांमध्ये याचा उल्लेख सापडतो.
advertisement
आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की जौ किंवा गव्हाच्या दाण्याने गर्भधारणा कशी ओळखत असतील?
तर त्यावेळी महिलांनी आपलं मूत्र (युरिन) जौ आणि गव्हाच्या दाण्यांवर टाकायचं आणि मग काही दिवसांनी हे दाणे उगवतात की नाही हे पाहिलं जायचं. जर दाणे उगवले, तर समजायचं की महिला गर्भवती आहे. जर काहीच उगलं झाला नाही, तर गर्भधारणा झालेली नाही असं मानलं जायचं.
advertisement
आश्चर्य म्हणजे मुलगा होणार की मुलगी याचाही अंदाज याच पद्धतीने लावला जायचा
या पारंपरिक पद्धतीत एक अजून मजेशीर गोष्ट होती. ती म्हणजे, जर फक्त जौ उगवलं, तर मानायचं की मुलगा होणार. फक्त गहू उगवलं, तर समजायचं की मुलगी होणार आणि हे अंदाज खरे देखील ठरायचे.
आजच्या विज्ञानाच्या दृष्टीने ही पद्धत किती खरी होती हे सांगता येणार नाही, पण प्राचीन काळातल्या लोकांची निरीक्षणशक्ती आणि कल्पनाशक्ती नक्कीच वाखाण्याजोगी होती.
advertisement
पूर्वीच्या काळात, आजीबाई किंवा अनुभवी स्त्रिया, गर्भवती महिलेचा चेहरा, पोटाची ठेवण आणि एकंदर शरीर पाहून गर्भधारणा आणि लिंग काय असेल हे ओळखायच्या हे नक्कीच एक कौशल्य होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 07, 2025 6:18 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pregnancy Test Fact : अल्ट्रासाउंड मशीन नव्हतं तेव्हा हजारो वर्षांपूर्वी कशी व्हायची प्रेग्नेन्सी टेस्ट? ही पद्धत क्वचितच कोणाला माहित