Ginger Real or Fake: सावधान!आलं समजून तुम्ही लाकूड तर खात नाही आहात ना? खरं आलं कसं ओळखायचं, जाणून घ्या सोप्या टिप्स्
- Published by:Tushar Shete
Last Updated:
How to identify Fake Ginger: चहापासून भाजीत वापरल्या जाणाऱ्या आल्याचे अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. सध्या बाजारात भेसळयुक्त आलं विकण्याचे प्रकार सुरू झालेत. आम्ही आज तुम्हाला खरं आणि खोटं आलं ओळखण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
मुंबई: आलं आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक. अगदी चहापासून ते शाकाहारी, मासांहारी भाज्यांध्ये आल्याचा वापर सर्रासपणे दिसून येतो. मटन,मच्छी खाताना जोपर्यंत आलं-लसणाचं वाटण भाजीत पडत नाही तोपर्यंत ती भाजी आपल्या गळ्याखाली उतरत नाही. आल्याचे अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. मात्र सध्या बाजारात भेसळयुक्त आलं विकण्याचे प्रकार सुरू झालेत. आम्ही आज तुम्हाला खरं आणि खोटं आलं ओळखण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.त्या आधी जाणून घेऊयात आल्याच्या फायद्यांविषयी
हिवाळ्यात आलं खाण्याचे फायदे
आधी सांगितल्या प्रमाणे आल्याचे औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे थंडीच्या दिवसात आल्याचा चहा तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेऊ शकतो.
सर्दी आणि खोकला:-
हिवाळ्यात आलं खाल्याने सर्दी खोकल्या सारख्या सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.तुम्ही चहामध्ये आलं टाकून ते पिऊ शकता किंवा जर तुम्हाला जास्त चांगला परिणाम हवा असेल तर गरम पाण्यात थोडी हळद टाकून त्यात आलं घातल्यास तुम्हाला अनेक फायदे होतील.
advertisement
रोग प्रतिकारशक्ती:-
आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आलं फायद्याचं ठरू शकतं. अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही आहारात आल्याचाही समावेश करू शकता.
पोटाच्या समस्या:-
अपचन, बद्धकोष्ठता किंवा पोटाशी संबंधित अन्य आजारांवर आलं खाणं गुणकारी ठरू शकतं.
हे झाले खऱ्या खुल्याआल्याचे फायदे. मात्र जर तुम्ही चुकून बनावट किंवा नकली आलं खाल्लं तर जुलाब,तोंडाची जळजळ, उलट्या आणि मळमळ, रक्त पातळ होणे किंवा पचनाचा त्रास, चेहऱ्यावर डाग येणे अशा समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.
advertisement

खरं आणि नकली आलं कसं ओळखायचं?
चकचकीतपणा:-
साधारणपणे आपण स्वच्छ आणि चमकदार आलं खरेदी करतो. मात्र असं आलं खाणं धोक्याचं ठरू शकतं. कारण आलं साफ करण्यासाठी ते डिटर्जंट आणि ऍसिडने धुतलं जातं. अनेकदा चकाकीमुळे खरं आणि नकली आलं ओळखणं कठीण जातं. त्यामुळे चकचकीत आलं खरेदी करण्याचा मोह टाळा.
advertisement
वास घ्या:-
आलं खरं की नकली हे तुम्ही त्याच्या वासावरून ओळखू शकता. आलं विकत घेण्यापूर्वी त्याचा एक तुकडा करून त्याचा वास घ्या. जर त्या आल्याला तिखट सुगंध आला तर समजून जा की ते आलं खरं आहे. मात्र ते आलं खोटं किंना नकली असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही.
advertisement
आलं सोलून पाहा:-
आलं सोलताना त्याची साल हाताला चिकटली किंवा आल्याचा वास येत असेल तर ते आलं खरं असेल. मात्र जर ते आलं नकली किंवा बनावट असेल तर ते कडक असेल आणि त्याला वासही येणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 19, 2024 7:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ginger Real or Fake: सावधान!आलं समजून तुम्ही लाकूड तर खात नाही आहात ना? खरं आलं कसं ओळखायचं, जाणून घ्या सोप्या टिप्स्