तुमचे मित्र Real आहेत का Fake? हे 6 संकेत मिळाले तर समजून जा आहे Red Flag
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
मित्रमैत्रिणींची पारख चुकली का याचं वाईटही वाटतं. पण असं वाईट वाटण्यापेक्षा नवे मित्रमैत्रिणी जोडतानाच थोडं सावध राहिलं तर किती बरं होईल!
मुंबई, 17 डिसेंबर : आपण ज्यांना जवळचे मित्र समजतो ते कधीतरी अगदीच आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळं वागून काहीसा धक्का देतात. अशा वेळी आपली मित्रमैत्रिणींची पारख चुकली का याचं वाईटही वाटतं. पण असं वाईट वाटण्यापेक्षा नवे मित्रमैत्रिणी जोडतानाच थोडं सावध राहिलं तर किती बरं होईल! खरे मित्र कधीही दिखावा करत नाहीत. जे फक्त दिखावाच करतात ते कदाचित खरे मित्र असू शकत नाहीत. तुमच्याकडे त्यांचं काही काम असल्याशिवाय किंवा तुमच्याकडून काही फायदा त्यांना दिसत असल्याशिवाय ते तुमच्याशी मैत्री करणार नाहीत. खरे मित्र कसे ओळखावेत आणि खोट्यांपासून दूर कसं राहावं यासाठी काही गोष्टी आम्ही तुम्हाला सुचवत आहोत.
1 फरक ओळखा
खरे मित्र नेहमी तुम्हाला भावनिकदृष्ट्या आधार देतात. तुमच्या कुठल्याही कठीण आणि ताणतणावात ते तुमच्या बरोबर असतात. तुम्ही त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवू शकता. केवळ सहानुभूती म्हणून ते तुमच्याबरोबर येत नाहीत तर मनापासून तुमची सोबत करतात.
2 गरजेच्या वेळी गायब होतात का?
तुमचे खरे मित्र मैत्रिणी तुमच्या गरजेच्या वेळी कधीही गायब होणार नाहीत. कदाचित तुम्ही हाक मारण्यापूर्वीच ते तुमच्यासाठी उभे राहतील. तुम्हाला काय हवंय, काय वाटतंय हे तुम्ही त्यांना सांगायचीही गरज भासणार नाही.
advertisement
3 एकतर्फीपणा नको
खरी मैत्री असेल तर तिथे एकतर्फीपणाला थारा नसतो. तुम्ही आणि तुमचे मित्र दोघेही सारख्याच जबाबदारीने एकमेकांसाठी उभे राहाल. एकमेकांबरोबर असताना कुणीही फक्त स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या सुख-दुःखाबद्दल बोलणार नाहीत. दोघांच्याही आयुष्य, सुख-दुःख, अडीअडचणी यांना सारखंच महत्त्व असेल.
4 अविश्वास
मैत्री खरी असते तेव्हा त्यात अविश्वासाला थारा नसतो. एकमेकांना दिलेला शब्द पाळण्यास मैत्रीत सर्वाधिक महत्त्व असतं. विशेष म्हणजे एकदा विश्वास ठेवला की या मित्रांवर तुम्ही शंभर टक्के विसंबून राहू शकता. मात्र, जिथे असा विश्वास ठेवता येत नाही तिथे खरंच मैत्री आहे का हे तुम्हाला तपासून पहायला हवं.
advertisement
5 स्पर्धा
मैत्रीत एकमेकांच्या बरोबरीने पुढे जाण्याला प्राधान्य असतं. एकमेकांबद्दल स्पर्धेला मैत्रीत थारा नसतो. एकमेकांची एखादी गोष्ट पटली नाही तरी मैत्रीत परस्परांचा आदर कमी होत नाही. शिवाय एकमेकांचा विश्वासघात करण्याचा विचारही मनात येत नाही. क्वचित तशी वेळ उलीच तर स्वतः त्याची कबुली देण्यात मित्रांना कमीपणा वाटत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 17, 2023 6:31 AM IST









