नकली मेकअप प्रॉडक्ट कसं ओळखाल; एकाच गोष्टीतून सर्व संशय होईल दूर!

Last Updated:

सौंदर्य प्रसाधनांमध्येही अलिकडच्या काळात खूपच मोठ्या प्रमाणावर बनावटीचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार कसे ओळखावे?

+
News18

News18

पुणे, 21 ऑगस्ट :   कॉस्मेटिक्स हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय झाला असल्याने सौंदर्य प्रसाधनांचे मार्केट खूप प्रचंड वाढले आहे. एखाद्या लहान शहरातही कॉस्मेटिक्स उद्योगात महिन्याकाठी कित्येक करोडोंची उलाढाल होत असते. जिथे पैसे तिथे बनावटी व्यवहार आपसूकच येतात. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांमध्येही अलिकडच्या काळात खूपच मोठ्या प्रमाणावर बनावटीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आपण एवढे पैसे मोजून घेतलेले सामान नकली निघू नये, यासाठी आता ग्राहकांनीच सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.  ही बनावट कशी ओळखावी याबाबत पुण्यातल्या प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट ऋतुजा आल्हाट यांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
1. ब्रँडचा लेबल तपासा : बनावटी कॉस्मेटिक्स न ओळखू येण्याचं कारण म्हणजे त्यावरही अगदी ओरिजनल ब्रॅण्डसारखाच लोगो आणि लेबल असते. वरवर पाहता दोन्हींच्या लोगो आणि लेबलमध्ये फरक दिसत नाही. पण जरा काळजीपुर्वक, निरखून पाहिले, तर असली आणि नकलीमधला फरक लगेच जाणवेल. त्यामुळे कॉस्मेटिक्स खरेदी करण्यापुर्वी आपल्या नेहमीच्या ब्रॅण्डचा लोगो आणि लेबल एकदा नीट बघून घ्या. फॉण्ट, साईज लक्षात ठेवा. आणि अगदी तशाच पद्धतीचा लोगो आणि लेबल ज्यावर असेल, ते खरेदी करा. थोडा जरी फरक जाणवला तरी खरेदी करणे टाळा.
advertisement
2. टेक्स्चर बघा : प्रत्येक ब्रॅण्डच्या कॉस्मेटिक्सचा एक खास सुवास असतो. तसेच त्याचे टेक्स्चरही आपल्याला माहिती असते. त्यामुळे सुवास आणि टेक्स्चर या दोन गोष्टी तपासूनच खरेदी करा.  तुम्ही एखादा ब्रॅण्ड पहिल्यांदाच वापरणार असाल तर इंटरनेटवर त्या ब्रॅण्डच्या ऑफिशियल साईटवरून आधी व्यवस्थित माहिती घ्या आणि नंतरच खरेदी करा.
advertisement
3. डिस्काऊंटमुळे होऊ शकतो घात : उच्च प्रतीचे दर्जेदार कॉस्मेटिक्स नेहमीच महाग असतात. त्यांच्यावर फारफार तर 10 ते 15 टक्के डिस्काऊंट मिळू शकतो. जर एखादे महागडे ब्रॅण्डेड कॉस्मेटिक्स 40 टक्के, 50 टक्के सूट अशा ऑफरवर मिळत असेल, तर नक्कीच ते नकली असू शकते. डिस्काऊंटचा मोह करू नका. त्याऐवजी अशावेळी त्या ब्रॅण्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ब्रॅण्ड सध्या काही ऑफर देत आहे का हे तपासा आणि त्यानंतरच खरेदी करा.
advertisement
4. बारकोड बारकाईने बघा : प्रत्येक ब्रॅण्डेड आणि ओरिजनल उत्पादनांवर त्यांचा स्वतंत्र बारकोड आणि सिरियल नंबर असतो. ज्यावर बारकोड आणि सिरियल नंबर नसतोच किंवा ओळखू न येण्यासारखा अस्पष्ट असेल तर ते प्रोडक्ट घेणे टाळावे, अशी माहिती आल्हाट यांनी दिली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
नकली मेकअप प्रॉडक्ट कसं ओळखाल; एकाच गोष्टीतून सर्व संशय होईल दूर!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement