Almond Milk Benefits : बदाम दुधाचे फायदे कोणते? काय आहे तज्ज्ञांचं मत?

Last Updated:

Almond Milk Benefits : बदामाच्या दुधाचे नेमके काय फायदे आहेत किंवा त्यामधून कुठले घटक आपल्याला शरीराला मिळतात याविषयीची माहिती आहारतज्ञ जया गावंडे यांनी सांगितली आहे.

+
‎बदाम

‎बदाम दुधाचे हे होतात फायदे

‎छत्रपती संभाजीनगर : बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसंच बदामाचं दूध देखील खूप फायदेशीर ठरतं. त्यामधून भरपूर प्रमाणात पोषक घटक आपल्याला भेटत असतं. बदामाच्या दुधाचे नेमके काय फायदे आहेत किंवा त्यामधून कुठले घटक आपल्याला शरीराला मिळतात याविषयीची माहिती आहारतज्ञ जया गावंडे यांनी सांगितली आहे.
‎ज्या लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्सचा त्रास आहे, अशा लोकांसाठी हे बदामाचे दूध खूप फायदेशीर आहे. बदामाच्या दुधामध्ये विशेष करून कॅलरीज कमी असतात. गाईच्या दुधापेक्षा 70 ते 80% ने या कॅलरीज कमी असतात. त्यासोबतच कार्बोहायड्रेटचं प्रमाण देखील यामध्ये कमी असतं. काही जे ब्रँड असतात ते याला फोर्टीफाईड ज्यामुळे यामध्ये कॅल्शियम विटामिन डी ई ए ते हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात. पण या अलमंड मिल्क मध्ये प्रथिने कमी असतात. त्यासोबतच यामध्ये विटामिन ई आहे आणि ते अँटिऑक्सिड भरपूर प्रमाणात देते.
advertisement
‎या दुधामुळे आपल्याला हृदयविकार आणि शुगर साठी फायदेशीर राहू शकतात. तसंच यामध्ये कोलेस्ट्रॉल देखील कमी असतात. तसंच यामुळे जे एल डी एल असतात ते कमी करून  एचडीएल वाढवण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच यामुळे डोळ्याचे आरोग्य देखील सुधारायला मदत होते. आशे याचे भरपूर प्रमाणात फायदे होतात. ‎जर तुम्हाला घरी हे बदामाचे दूध तयार करायचं असेल तर त्याकरता तुम्ही रात्रभर बदाम भिजत घालायचं आणि सकाळी त्या बदामाचे वरचे कव्हर काढून त्यामध्ये थोडसं पाणी घालून हे एकजीव करून घ्यायचं आणि ते काढल्यानंतर तुमचं फ्रेश असं हे मिल्क तयार होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Almond Milk Benefits : बदाम दुधाचे फायदे कोणते? काय आहे तज्ज्ञांचं मत?
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement