5 Protein superfoods: बॉडी बनवायची आहे, मग फक्त व्यायाम नको, खा हे 5 सुपरफूड्स, शरीर होईल पिळदार, व्यक्तिमत्व होईल धारदार
- Published by:Tushar Shete
Last Updated:
5 Protein rich superfoods in Marathi: स्नायू किंवा मसल्स बनवण्यासाठी अनेक तरूण प्रोटिन पावडर खातात. मात्र या प्रोटिन पावडरचे शरीरावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला असे 5 सुपरफूड सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला मसल्स बनवणं सोपं जाईल आणि तुमच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.
मुंबई : पिळदार आणि व्यायामाने कमावलेलं शरीर हे पुरूषांच्या भारदस्त व्यक्तिमत्वात वाढ करतं. पुरूषांचं शरीर पिळदार दिसण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात ते स्नायू. पुरूषांच्या शरीरावर स्नायूंऐवजी मांस जास्त असेल तर त्यांचं शरीर आकर्षक न दिसता बेढब दिसू लागतं. इतकंच काय शरीरात योग्य प्रमाणात स्नायूंची वाढ झाली नाही तर शारीरिक कार्यातही अनेक अडचणी येतात. एक साध उदाहरण घ्या. फिट असलेला माणूस 4 मजले सहज चढून जाऊ शकतो. तर स्थूल व्यक्तीला दुसरा मजला चढतानाच दम लागतो. त्यामुळे स्नायू हे फक्त दिसण्यातच नाही तर विविध प्रकारांनी तुमच्या आरोग्याच्या फायद्याचे ठरू शकतात. सध्या स्नायू किंवा मसल्स बनवण्यासाठी अनेक तरूण प्रोटिन पावडर खातात. मात्र या प्रोटिन पावडरचे शरीरावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा 5 पदार्थांची नावं सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला मसल्स बनवणं सोपं जाईल आणि मुख्य म्हणजे या पदार्थांचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाहीत.
जाणून घेऊयात त्या 5 सुपरफूडबद्दल जे स्नायूंच्या वाढीसाठी फायद्याचे आहेत.
1) बदाम :

बदाम हे स्नायूंच्या वाढीसाठी फायद्याचे मानले जातात. बदाम खाल्ल्याने स्नायू आणि हाडं मजबूत व्हायला मदत होते. बदाम खाल्ल्यामुळे स्नायूंचं नुकसान कमी होतं. बदामामध्ये फायबरचं प्रमाणही जास्त असतं ज्यामुळे दिवसभर पोट भरलेले राहतं. यामुळे वजनही कमी व्हायला मदत होते. जर तुमच्या शरीरात मांसपेशी वाढत नसतील रोज 10 ते 12 भिजवलेले बदाम खाल्ल्याने स्नायूंची चांगली वाढ होऊ शकते.
advertisement
2) अंडी किंवा चिकन :
जर तुम्ही मांसाहारी असाल तर अंडी आणि चिकन हा तुमच्यासाठी प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत आहे. तुम्ही व्यायाम करत असाल आणि तुम्हाला मसल्स वाढवायचे असतील. तर रोज तुम्ही 3 ते 4 उकडलेली अंडी खाऊ शकता. मात्र अंड खाताना त्यातला पिवळा बलक खाणं टाळा. यामुळे तुमचं वजन वाढणार नाही. स्नायूंच्या वाढीसाठी अंडी खूप फायदेशीर असल्याचे अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे. चिकनमध्येही प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात.त्यामुळे शरीराला योग्य त्या प्रमाणात प्रोटिन्स मिळू शकतात.
advertisement
3) कडधान्ये :

advertisement
कडधान्यात प्रथिनं ही चांगल्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात कडधान्यांचं सेवन केल्यास स्नायूंना बळकटी मिळू शकते. राजमा, हरभरे, वाटाण्यांच्या समावेश तुम्ही जेवणात करू शकता. कडधान्यांमध्ये प्रोटिन्सशिवाय फायबर्स, अनेक प्रकारची खनिजं, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे घटक असतात जे स्नायूंच्या वाढीस फायद्याचे ठरतात.
4) डाळी :
कडधान्यं आणि बियांप्रमाणे डाळींतही चांगल्या प्रमाणात प्रथिनं आढळून येतात. मसूराची डाळ ही सर्वात जास्त पौष्टिक आणि प्रथिनांनी समृद्ध मानली जाते. अर्धा कप मसूराच्या डाळीतूनसाधारण 9 ग्रॅमपर्यंत प्रथिनं मिळतात. यावरूनच त्यात असलेल्या प्रथिनांची विपुलता दिसून येते. याशिवाय मसूराच्या डाळीमध्ये कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजं देखील चांगल्या प्रमाणात आढळून येतात.
advertisement
5) बिया :

मूर्ती लहाण पण कीर्ती महान असा या बियांचा उल्लेख करता येईल. बिया दिसायला जरी लहान असल्या तरीही त्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वं असतात म्हणूनच बियांचा उल्लेख सुपरफूड केला जातो. भोपळ्याच्या बिया, तुळशीच्या बिया, अंबाडीच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, चिया सीड्स यांचा दैनंदिन आहारात समावेश करता येऊ शकतो. साधारण अर्धा कप बियांमध्ये 18 ग्रॅम पर्यंत प्रथिनं आढळून येतात.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 19, 2025 1:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
5 Protein superfoods: बॉडी बनवायची आहे, मग फक्त व्यायाम नको, खा हे 5 सुपरफूड्स, शरीर होईल पिळदार, व्यक्तिमत्व होईल धारदार