हॅन्डक्राफ्ट दागिने-कुर्ती-साड्या फक्त 550 रुपयांपासून! खरेदीसाठी गाठा बोरिवलीतील 'हे' ठिकाण

Last Updated:

देशभरातील विविधांगी कला आणि हस्तकलेचा अद्भुत संगम असलेला 'स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट हँडीक्राफ्ट प्रदर्शन' भरले आहे. कोलकत्ता, बनारस, आसाम, काश्मीर, जयपूर यांसारख्या विविध राज्यांतील प्रसिद्ध आणि पारंपरिक वस्तू अगदी एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत

+
फक्त

फक्त ₹550 पासून पोचमपल्ली, बनारसी आणि आसामी साड्या... खरेदीसाठी थेट बोरिवली गाठा! देशभरातील नामांकित साड्या, कुर्ती, काश्मिरी चा

मुंबई : मुंबईतील खरेदीप्रेमींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. देशभरातील विविधांगी कला आणि हस्तकलेचा अद्भुत संगम असलेला 'स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट हँडीक्राफ्ट प्रदर्शन' बोरिवली येथील कोरा केंद्र मैदानावर भरले आहे. कोलकत्ता, बनारस, आसाम, काश्मीर, जयपूर यांसारख्या विविध राज्यांतील प्रसिद्ध आणि पारंपरिक वस्तू अगदी एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे आता खरेदीसाठी दूर जाण्याची गरज नाही.
हे प्रदर्शन खास यासाठी आहे, कारण येथे देशातील विविध भागांतील कुशल कारागिरांनी हाताने बनवलेल्या वस्तू अत्यंत किफायतशीर दरात विक्रीसाठी आणल्या आहेत.
साड्यांचा भव्य संग्रह आणि आकर्षक दर
या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे साड्यांचा मोठा आणि आकर्षक संग्रह. देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रसिद्ध साड्या येथे उपलब्ध आहेत.
बांधणी साडी (पोचमपल्ली) : फक्त 550 रुपयांपासून.
advertisement
कोलकत्ता साडी : फक्त 700 रुपयांपासून.
बनारसी साड्या : 1,250 पासून ते 12,000 रुपयांपर्यंत.
आसामी साड्या : 1,000पासून ते 12,000 रुपयांपर्यंत.
काश्मिरी हँडवर्क साड्या : 1500 पासून ते 1800 रुपयांपर्यंत.
यासोबतच चंदेरी (2400 रुपयांपासून), माहेश्वरी, कॉटन आणि विणकाम (Vicat) साड्यांचाही मोठा साठा येथे उपलब्ध आहे.
कुर्ती आणि ड्रेसमध्ये विविधता
फक्त साड्याच नव्हे, तर मुलींसाठी खास अनारकली ड्रेस, प्युअर कॉटन कुर्ती आणि ड्रेसचे विविध प्रकार इथे आहेत. जयपुरी कॉटन कुर्ती फक्त 450 रुपयांपासून उपलब्ध आहेत. याशिवाय लखनऊ कुर्ती, काश्मिरी कुर्ती, पोचमपल्ली आणि बांधणीचे ड्रेस तसेच प्युअर खादीचे कपडे देखील खरेदीसाठी ठेवले आहेत.
advertisement
नैसर्गिक हँडक्राफ्ट ज्वेलरीचे खास आकर्षण
या प्रदर्शनातील आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हाताने बनवलेली (हँडक्राफ्ट) ज्वेलरी. विशेषतः पश्चिम बंगालमधील कारागिरांनी नैसर्गिक वस्तूंचा वापर करून तयार केलेले कानातले आणि नेकलेस लक्ष वेधून घेत आहेत. चिंचोक्याच्या बिया, भोपळ्याच्या बिया, तांदूळ, सुपारी, शंख-शिंपले यांसारख्या गोष्टींपासून बनवलेले कानातले, टेराकोटा ज्वेलरी आणि हाताने बनवलेली ऑक्साईड ज्वेलरी इथे उपलब्ध आहे
advertisement
घरगुती वस्तू आणि खाद्यपदार्थ
यासोबतच, काश्मिरी लोकरीपासून बनवलेल्या उबदार बेडशीट्स आणि चादरी फक्त 1200 रुपयांपासून उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या सुंदर बॅग्स आणि वेगवेगळ्या राज्यांतील खास खाद्यपदार्थ देखील येथे विक्रीसाठी आहेत. हा 'स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट हँडीक्राफ्ट प्रदर्शन' मुंबईकरांना देशभरातील कलाकुसरीचा आनंद एकाच ठिकाणी घेण्यासाठी एक सुवर्णसंधी देत आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
हॅन्डक्राफ्ट दागिने-कुर्ती-साड्या फक्त 550 रुपयांपासून! खरेदीसाठी गाठा बोरिवलीतील 'हे' ठिकाण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement