तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ सोडा, आधी प्राण्यांची चरबी आहे का ते तपासा? नाहीतर मोडेल श्रावण, कसं ओळखायचं वाचा

Last Updated:

काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे टूथपेस्ट नॉनव्हेज असू शकतात! काही विदेशी कंपन्या टूथपेस्ट तयार करताना प्राणिज घटक वापरतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : अनेक लोक दररोज सकाळी उठल्यानंतर टूथपेस्ट आणि ब्रशने दात स्वच्छ करतात. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि दातांवरील पिवळसरपणा देखील कमी होतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की तुमचा टूथपेस्ट नॉनव्हेज असू शकतो? होय, ही गोष्ट आश्चर्यकारक वाटेल पण ही खरी आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
भारतीय टूथपेस्ट बहुतेक वेळा व्हेज असतो
भारतात तयार होणारे बहुतांश टूथपेस्ट्स पूर्णपणे वनस्पतीजन्य (व्हेजिटेरियन) घटकांपासून बनवलेले असतात. उदाहरणार्थ, लवंग, पुदीना, बबूल, मीठ, त्रिफळा इत्यादी नैसर्गिक घटक वापरले जातात. त्यामुळे अनेक लोक उपवासाच्या दिवशीही अशा टूथपेस्टचा वापर बिधास्त करतात.
पण काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे टूथपेस्ट नॉनव्हेज असू शकतात! काही विदेशी कंपन्या टूथपेस्ट तयार करताना प्राणिज घटक वापरतात. उदा.:
advertisement
ग्लिसरीन जो जनावरांच्या चरबीपासून बनवली जातं. कॅल्शियम फॉस्फेट जे हाडांपासून मिळतं.
हे घटक टूथपेस्टमध्ये त्याच्या टिकाऊपणासाठी घालण्यात येतात. त्यामुळे अशा टूथपेस्टचा वापर करताना तुम्ही अनवधानाने नॉनव्हेज वापरत आहात, हे कळतही नाही.
वेज आणि नॉनवेज टूथपेस्ट कसे ओळखाल?
भारतात विक्रीस असलेल्या टूथपेस्टच्या पॅकेटवर तुम्हाला एक छोटं चिन्ह दिसेल:
हिरव्या रंगाचा चौकोन जे व्हेजिटेरियन प्रॉडक्ट असल्याचं सांगतं.
advertisement
तपकिरी/लाल रंगाचा चौकोन हा नॉनव्हेज प्रॉडक्ट आहे.
तुम्ही पॅकेजिंगवर हे बघून सहज ओळखू शकता की तो टूथपेस्ट शाकाहारी आहे की मांसाहारी.
थोडक्यात सांगायचं तर…
दररोज वापरल्या जाणाऱ्या टूथपेस्टमध्येही नॉनव्हेज घटक असू शकतात, विशेषतः जर तो प्रॉडक्ट इंटरनॅशनल ब्रँडचा असेल तर. त्यामुळे टूथपेस्ट खरेदी करताना त्यावरील मार्किंग तपासणं गरजेचं आहे.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ सोडा, आधी प्राण्यांची चरबी आहे का ते तपासा? नाहीतर मोडेल श्रावण, कसं ओळखायचं वाचा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement