Kasuri methi benefits: हिवाळ्यात होतोय सांधेदुखीचा त्रास, खा ‘ही’ पानं, दगडासारखी मजबूत होतील हाडं
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Kasuri Methi health Benefits in Marathi: कसुरी मेथी हा अनेकांच्या आहारातला एक पदार्थ. जेवणाची चव वाढवणाऱ्या कसुरी मेथीचे आयुर्वेदीक फायदे फारच कमी जणांना माहिती असतील. कसुरी मेथीमध्ये जीवनसत्त्वं, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम फायबर्स आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे आपल्या शरीराला एक नाही तर अनेक फायदे होतात.
मुंबई : आपल्या जेवणातले पदार्थ किंवा मसाले हे अन्नाची चव तर वाढवताच मात्र अनेक आजारांवर ते गुणकारी ठरू शकतात. हिवाळा सुरू झाला अनेकांना सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. मात्र तुमच्या किचनमधल्या या हिरव्या पानांचा वापर केला तर तुमची सांधेदुखी फक्त दूरच नाही होणार तर ती पळूनही जाईल आणि तुमच्या हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन तुमची हाडं दगडासारखी टणक होतील.
जाणून घेऊयात हाडं मजबूत करणाऱ्या या 'कोमल' पानांविषयी
कसुरी मेथी हा अनेकांच्या आहारातला एक पदार्थ. जेवणाची चव वाढवणाऱ्या कसुरी मेथीचे आयुर्वेदीक फायदे फारच कमी जणांना माहिती असतील. कसुरी मेथीमध्ये जीवनसत्त्वं, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम फायबर्स आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे आपल्या शरीराला एक नाही तर अनेक फायदे होतात.
advertisement

जाणून घेऊया कसुरी मेथीचे आश्चर्यकारक फायदे
शरीराला उबदार ठेवते
कसुरी मेथीचा पोत हा उष्ण आहे. त्यामुळे हिवाळ्यात कसूरी मेथी शरीराला आतून उबदार ठेवते. कणिक मळताना त्यात कसुरी मेथी घालून चपाती केल्यास त्या चपात्यांच्या पौष्टिक गुणधर्मांमध्ये वाढ होते.
advertisement
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
कसुरी मेथीत फायबर्स हे अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्तामध्ये कसुरी मेथीचा वापर केल्यास किंवा कसुरी मेथीच्या चपात्या खाल्ल्यास शरीर आतून उबदार राहील. फायबर्समुळे पोट भरलेलं राहील शिवाय पचनही सुधारेल. ज्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फायदा वजन कमी व्हायला होईल.
advertisement
पचनासाठी फायद्याची
कसुरी मेथी ही पोटासाठी एका रामबाण औषधापेक्षा कमी नाही. कसुरी मेथीत असलेले अँटिऑक्सिडंटमुळे पचनक्रिया सुधारून आतड्यांवरचा ताण कमी होतो. यामुळे पोटाला आराम मिळतो. तर फायबर्समुळे अन्न सहज पचायला मदत होते. त्यामुळे गॅसेस, बद्धकोष्ठता, अपचन, पोटफुगी असे आजार टाळता येतात.
advertisement
डायबिटीस रूग्णांसाठी फायद्याची
कसुरी मेथीमुळे कार्बोहायड्रेट्स लवकर पचत नाही. त्यामुळे ते पचून रक्तात साखर उतरण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे कसुरी मेथीचं सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता कमी होऊन पॅक्रियाजला आराम मिळतो.
हे सुद्धा वाचा : Meaning Of Kasuri : कसुरी मेथी वापरता, पण 'कसुरी' चा नेमका अर्थ काय? 99% लोकांना माहित नाही..
हाडांसाठी फायदेशीर
advertisement
कसुरी मेथीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं. यामुळे हाडांचा ठिसूळपणा दूर होऊन हाडं मजबूत व्हायला मदत होते. शिवाय कसुरी मेथीतल्या विविध पोषक तत्वं आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो. थंडीत जर तुमच्या हातापायांना सूज येत असेल तर त्यावरही कसुरी मेथी गुणकारी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2024 4:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kasuri methi benefits: हिवाळ्यात होतोय सांधेदुखीचा त्रास, खा ‘ही’ पानं, दगडासारखी मजबूत होतील हाडं