Kitchen Tips : गरम भाताला दगडासारखा वास येतोय? यामागची कारणं आणि सोपे उपाय लगेच जाणून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकदा आपण पाहतो की उरलेला भात दुसऱ्या दिवशी गरम केल्यावर त्याला दगडासारखा किंवा आंबूस वास येतो. अनेक घरांमध्ये ही समस्या वारंवार होते, काहीजण याला स्वाभाविक मानतात.
मुंबई : घरात भात शिजवून ठेवणं आणि नंतर खाण्यासाठी साठवणं ही गोष्ट नेहमीच केली जाते. पण अनेकदा आपण पाहतो की उरलेला भात दुसऱ्या दिवशी गरम केल्यावर त्याला दगडासारखा किंवा आंबूस वास येतो. अनेक घरांमध्ये ही समस्या वारंवार होते, काहीजण याला स्वाभाविक मानतात. मात्र, यामागे कारणं आणि योग्य उपाय जाणून घेणं महत्वाचं आहे.
भाताला वास का येतो?
USDA च्या फूड सेफ्टी मार्गदर्शनानुसार, शिजवलेला भात जर खोलीच्या तापमानावर जास्त वेळ (२ तासांपेक्षा जास्त) ठेवला तर त्यात Bacillus cereus नावाचे जीवाणू वाढतात. हे जीवाणू थंड झाल्यावरही नष्ट होत नाहीत आणि गरम केल्यावर वास येऊ शकतो. हा भात खाल्ल्याने फूड पॉइझनिंगचा धोका वाढतो.
फ्रिजमध्ये भात किती वेळ ठेवावा?
शिजवलेला भात थंड झाल्यावर 1 तासाच्या आत फ्रिजमध्ये ठेवा.
advertisement
फ्रिजमध्ये ठेवलेला भात जास्तीत जास्त 3 ते 4 दिवसांपर्यंत खाण्यासाठी सुरक्षित असतो (Mayo Clinic, USDA).
फ्रीझरमध्ये ठेवला तर तो 1 ते 2 महिने टिकू शकतो, मात्र चव आणि पोत थोडा बदलतो.
वास टाळण्यासाठी उपाय:
लवकर थंड करा : भात शिजवल्यावर मोठ्या भांड्यात ठेवू नका, उथळ डब्यात (shallow container) घ्या ज्यामुळे तो पटकन थंड होईल.
advertisement
फ्रिजमध्ये लगेच ठेवा : 1 तासापेक्षा जास्त वेळ बाहेर ठेवू नका.
एअरटाइट कंटेनर वापरा ज्यामुळे ओलावा रहाणार नाही आणि वास येणार नाही.
खाण्यापूर्वी भात व्यवस्थित गरम (60°C पेक्षा जास्त) करा जेणेकरून बॅक्टीरिया नष्ट होतील.
गरम केल्यावर भाताला येणारा दगडासारखा वास हा चुकीच्या साठवणीमुळे होतो. योग्य तापमान आणि वेळेची काळजी घेतली तर हा वास पूर्णपणे टाळता येतो आणि भात सुरक्षितपणे खाता येतो.
advertisement
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2025 9:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : गरम भाताला दगडासारखा वास येतोय? यामागची कारणं आणि सोपे उपाय लगेच जाणून घ्या