कच्चा कांदा आणि लिंबू खायला का सांगतात? तुम्हाला याचे फायदे माहित आहे का?

Last Updated:

Onion with Lemon: कच्च्या कांद्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास अनेक आजार टाळता येतात. कांद्यामध्ये लिंबू मिसळल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो.

कांद्यामध्ये लिंबू मिसळल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो.
कांद्यामध्ये लिंबू मिसळल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो.
हेल्थ डेस्क:  कांद्याशिवाय  भाजीची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपल्या देशात कांद्याला इतकं महत्त्व आहे की, याच्याशी संबंधित उलाढाली आणि मुद्द्यांवरून सरकारेही कोसळून पडू शकतात. कांदा अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा वापरला जातो. मात्र, कच्चा कांदा खाण्याची सवय फार कमी लोकांना असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कच्च्या कांद्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास अनेक आजार टाळता येतात. कांद्यामध्ये लिंबू मिसळल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो. कांद्यामध्ये अॅलिसिनसारखं   सल्फर कंपाऊंड आढळतं, जे शरीरासाठी फायदेशीर आहे. कांद्याला फायबरचं पॉवर हाऊसही  म्हणतात. स्थूलपणा कमी करण्यासाठी कांदा फायदेशीर  मानला जातो.
कांद्यामध्ये लिंबू घालून सॅलाडप्रमाणं खाल्ल्यास त्याचे अनेक फायदे होतात. समग्र जीवनशैलीचे शिक्षक (होलिस्टिक लाइफस्टाइल कोच) ल्यूक कौटिन्हो  यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर कच्चा कांदा-लिंबू मिसळून खाण्याचे अनेक फायदे शेअर केले आहेत. त्यांनी लोकांना सल्ला दिलाय की, जेवण्यापूर्वी त्याचं सेवन केल्यास ते अनेक प्रकारे उपयुक्त ठरतं.
advertisement
कांदा आणि लिंबाचे फायदे
इंस्टाग्रामवर एक छोटा व्हिडिओ शेअर करताना कौटिन्हो म्हणाले की, जेवण्यापूर्वी कांद्यामध्ये लिंबाचा रस घालून खाणं हे उत्तम स्टार्टर आहे. कांदा पचनक्रिया वाढवतो. अभ्यासानुसार, कांद्यामध्ये प्रीबायोटिक इन्युलिन आणि फ्रुक्टोलिगोसेकराइड (inulin and fructooligosaccharides) असतात, जे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात. त्यामुळं रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित काम करते. कांदा अनेक प्रकारे खाल्ला जाऊ शकतो. कोशिंबीर, चटणी, चाट, भाजीची ग्रेव्ही या रूपात तो खाता येतो. कांद्यामध्ये टोमॅटो मिसळून कोशिंबीर बनवल्यास स्वाद आणखी छान लागतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचं संयुग असतं, जे कांद्यासह अन्न शोषण्यास मदत करतं.
advertisement
या लोकांनी कच्चा कांदा खाऊ नये
कांदा प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. ज्यांना अॅसिडिटीची समस्या आहे किंवा पोट फुगण्याची समस्या आहे किंवा ज्यांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम (Irritable Bowel Syndrome) आहे, त्यांनी कांदा खाऊ नये. यामुळं समस्या आणखी वाढू शकतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कच्चा कांदा आणि लिंबू खायला का सांगतात? तुम्हाला याचे फायदे माहित आहे का?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement