नटखट कृष्णासाठी हवा आकर्षक पाळणा, ठाण्यात फक्त 150 रुपयांपासून करा खरेदी
- Published by:News18 Marathi
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे: श्रीकृष्ण जन्माष्टमी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बाजार फुलले असून सर्वत्र श्रीकृष्णाच्या आकर्षक मूर्ती आणि पाळणे तसेच सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी होतेय. ठाण्यातील बाजारपेठांतही नटखट बाळकृष्णासाठी आकर्षक पाळणे अगदी स्वस्तात मिळत आहेत. ठाणे स्टेशनपासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावार विठ्ठल मंदिर गल्ली आहे. इथं पाळण्याच्या अनेक व्हरायटी फक्त 150 रुपयांपासून उपलब्ध आहेत.
advertisement
ठाणे स्टेशनजवळ असणाऱ्या विठ्ठल मंदिर गल्लीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सगळ्या वस्तू अगदी स्वस्तात मिळतात. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण छोट्या बाळकृष्णाला पाळण्यात ठेवून त्याची पूजा करतात. तुम्हालाही सुंदर पाळणा खरेदी करायचा असेल, तर या विठ्ठल मंदिर गल्लीमध्ये सुंदर पाळणे फक्त 150 रुपयांपासून मिळतील. या पाळण्यांमध्ये खूप व्हरायटी देखील उपलब्ध आहेत.
advertisement
या व्हरायटी उपलब्ध
ठाण्यातील अनेक दुकानांमध्ये तुम्हाला श्रीकृष्णासाठी वेगवेगळ्या व्हरायटीचे पाळणे मिळतील. या पाळण्यांमध्ये तुम्हाला लाकडाचा पाळणा, सुंदर डिझाईन असणारा पाळणा, स्टीलचा पाळणा, तांब्याचा पाळणा, फुलांचा पाळणा हे सगळे पाळणे उपलब्ध आहेत. यांची किंमत 150 रुपयांपासून सुरू होते. तुम्ही ज्या आकाराचा पाळणा घ्याल तशी पाळण्याची किंमत वाढत जाते. या पाळण्याची क्वालिटी सुद्धा चांगली असल्यामुळे तुम्ही एकदा पाळणा घेतला तर तो 2 ते 3 वर्ष तरी चांगला राहू शकतो, असं विक्रेते सांगतात.
advertisement
श्रीकृष्ण जन्माष्टमीला लागणारे मोठमोठे पाळणे सुद्धा इथे मिळतात. या पाळणांना तुम्ही सुंदर पद्धतीने तुम्हाला हवे तसे सजवू सुध्दा शकता. खाली ठेवणाऱ्या पाळण्यांसोबतच इथे तुम्हाला भिंतीला बांधता येणारा, झोक्यासारखा पाळणा सुद्धा मिळेल. याची किंमत सुद्धा फक्त शंभर रुपयांपासून सुरू होते.
advertisement
श्रीकृष्णाच्या मूर्तीही...
"आमच्या दुकानात तुम्हाला हव्या तशा पद्धतीचा पाळणा मिळेल. या पाळण्याची क्वालिटी चांगली असल्यामुळे ते अधिक दिवस टिकतात. जन्माष्टमीला मिळणाऱ्या पाळण्यांसोबतच आमच्याकडे त्यादिवशी पाळण्यात ठेवला जाणाऱ्या श्रीकृष्णाच्या मूर्ती सुद्धा मिळतात," असे ठाणे मार्केटमधील मन मंदिर या दुकानाचे मालक दिनेश यांनी सांगितले.
दरम्यान, तुम्हालाही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला सुंदर सजवलेल्या पाळण्यात घालून जन्माष्टमी साजरी करायची असेल, तर ठाण्यातील या मार्केटमधून अगदी स्वस्त किमतीत पाळण्याची खरेदी करू शकता.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 24, 2024 6:52 PM IST