ठाण्यातील मार्केटमध्ये गोकुळाष्टमीचा उत्साह, लहान मुलांसाठी राधा कृष्णाच्या लूकसाठी होतेय गर्दी, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
अनेक पालक आपल्या मुलांचा चालू करतात आणि सोशल मीडियावर त्यांचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करतात. तुमच्या मुलांचा असा सुंदर लुक करायचा असेल. तर, ठाणे मार्केट त्यासाठी बेस्ट आहे. ठाणे स्टेशनपासून फक्त 10 मिनिटांचे अंतरावर असणारे जनता रेडीमेड स्टोअर हे कपड्यांचे दुकान प्रसिद्ध आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : गोकुळाष्टमी अगदी आठवड्यावर येऊन ठेपली आहे. ठाणे मार्केटमध्येही गोकुळाष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. छोट्या राधा कृष्णाचे कपडे सध्या मार्केटमध्ये आलेले आहेत. छोट्या बाळांसाठी पिवळ्या रंगाचा कृष्णाचा पोशाख आणि मुलींसाठी सुंदर चनिया चोली, घागरा, परकर ब्लाऊज मार्केटमध्ये आलेले आहेत.
अनेक पालक आपल्या मुलांचा चालू करतात आणि सोशल मीडियावर त्यांचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करतात. तुमच्या मुलांचा असा सुंदर लुक करायचा असेल. तर, ठाणे मार्केट त्यासाठी बेस्ट आहे. ठाणे स्टेशनपासून फक्त 10 मिनिटांचे अंतरावर असणारे जनता रेडीमेड स्टोअर हे कपड्यांचे दुकान प्रसिद्ध आहे.
advertisement
येथे तुम्हाला लहान मुलांचे श्रीकृष्णाचे व्हरायटीमध्ये कपडे मिळतील. श्रीकृष्णाच्या कपड्यांसोबतच येथे लहान मुलींसाठी असणाऱ्या चनिया चोली, घागरा या राधाच्या लूकसाठी लागणाऱ्या गोष्टीसुद्धा उपलब्ध आहेत. श्रीकृष्णाच्या लुकसाठी लागणाऱ्या सेटमध्ये तुम्हाला कपड्यांसोबतच मोरपीस, बासुरी या सगळ्या गोष्टी मिळतील. यांची किंमत फक्त 300 रुपयांपासून सुरू होते. त्या दुकानात तुम्हाला अगदी न्यू बॉर्नपासून ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांचे कपडे मिळतील.
advertisement
health tips in marathi : रात्री झोपण्यापूर्वी अजिबातच हे पदार्थ खाऊ नयेत, डॉक्टरांचं ऐकायला हवं
'आमच्या इथे राधाकृष्ण चालू करण्यासाठी लागणारे सगळे कपडे मिळतात. नवीन जन्माला आलेला बाळापासून ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांपर्यंत सगळे कपडे आमच्या इथे मिळतात. यांची किंमत फक्त 300 रुपयांपासून सुरू होते. राधाच्या लूकमध्ये असणाऱ्या चनिया चोली याच्यामध्ये आमच्याकडे खूप व्हरायटी उपलब्ध आहे,' असे दुकानदार जीत शहा यांनी सांगितले. तुम्हालाही या जन्माष्टमीला तुमच्या लहानग्यांचा लुक अगदी सुंदर करायचे असेल तर, नक्की ठाणे मार्केटमधील या दुकानाला भेट द्या.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 19, 2024 8:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
ठाण्यातील मार्केटमध्ये गोकुळाष्टमीचा उत्साह, लहान मुलांसाठी राधा कृष्णाच्या लूकसाठी होतेय गर्दी, VIDEO