Health Tips : पायांमध्ये सारख्या मुंग्या आणि गोळे येतात? मग शरीरात असू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता

Last Updated:

व्हिटॅमिनची कमतरता झाल्यास त्याचे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होतात. त्यामुळे व्हिटॅमिनची गरज आहारातून पूर्ण होण्यासाठी सकस आणि व्हिटॅमिनयुक्त आहार घेणं खूप गरजेचं असतं. 

पायांमध्ये सारख्या मुंग्या आणि गोळे येतात? मग शरीरात असू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता
पायांमध्ये सारख्या मुंग्या आणि गोळे येतात? मग शरीरात असू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता
आपलं शरीर निरोगी राहावं आणि शरीरातील प्रत्येक अवयवाने आपलं कार्य नीट करावं, यासाठी व्हिटॅमिन्स खूप आवश्यक असतात. व्हिटॅमिनची कमतरता झाल्यास त्याचे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होतात. बऱ्याचदा आहारातून व्हिटॅमिनची गरज पूर्ण न झाल्यास सप्लिमेंट्सही घ्यावी लागतात. त्यामुळे व्हिटॅमिनची गरज आहारातून पूर्ण होण्यासाठी सकस आणि व्हिटॅमिनयुक्त आहार घेणं खूप गरजेचं असतं.
मानवी शरीराला आवश्यक असलेली व्हिटॅमिन्स छ 
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12 (कोबालअमाईन) ही मानवी शरीरासाठी आवश्यक असलेली व्हिटॅमिन्स आहेत.
व्हिटॅमिनचे फायदे : 
व्हिटॅमिन्सच्या मदतीने ब्रेन सेल्सची मेसेजिंग प्रोसेस नीट चालते. ही प्रोसेस खूप आवश्यक असते. कारण याच्याच मदतीने आपण कोणतीही अॅक्टिव्हिटी करू शकतो. या शिवाय सेल्स, टिश्यूज व नर्व्हजच्या पोषणासाठीही व्हिटॅमिन्स खूप गरजेची असतात.
advertisement
पायांच्या समस्या कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतात?  :
आजकाल अनेकांना पाय सुन्न पडण्याच्या किंवा पायांना गोळे येण्याचा त्रास होतो. याचं कारण म्हणजे शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आहे. या व्हिटॅमिनची कमतरता शरीरात असेल तर शिरांसबंधित समस्या जाणवतात. याच्या कमतरतेमुळे हात व पायाला मुंग्या येतात, ते सुन्न पडतात. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास पेरिफेरल व सेंट्रल नर्व्हला नुकसान पोहोचतं.
advertisement
शरीराला दररोज 2.4 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी 12 आवश्यक असतं. एवढ्या कमी प्रमाणात आवश्यक असलेल्या घटकाची कमतरता मात्र शरीरासाठी धोका निर्माण करू शकते. झाडं आणि वनस्पती व्हिटॅमिन बी 12 ची निर्मिती करत नसल्यामुळे, आपल्याला बी 12 मिळवण्यासाठी मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांवर अवलंबून राहावं लागतं.
व्हिटॅमिन बी 12 कमतरतेची लक्षणं : 
हात आणि पायांना मुंग्या येणं, जिभेला फोड येणं, हृदयाचे ठोके वाढणं, त्वचेवर पिवळसरपणा येणं, दिसण्यात अडचण येणं ही व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची मुख्य लक्षणं आहेत. आपल्याला त्रास होत असेल तर एकदा रक्ताची तपासणी केली पाहिजे. या शिवाय व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती कमी होणं, अशक्तपणा येणं इत्यादी लक्षणंही दिसतात. शरीरात व्हिटॅमिनची कमतरता होणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी त्यासाठी आहार सुधारायला हवा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : पायांमध्ये सारख्या मुंग्या आणि गोळे येतात? मग शरीरात असू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement