Belly Fat : रोज चालताय तरीही होत नाही पोटाची चरबी कमी, काय आहेत नेमकी कारणं? जाणून घ्या

Last Updated:

आजकालच्या काळात अनेक लोक वजन कमी करण्यासाठी रोज चालण्याचा व्यायाम करतात. पण अनेकदा सर्व प्रयत्न करून देखील पोटाची चरबी कमी होत नाही. पण, अनेकांना ही तक्रार असते की, रोज चालूनही त्यांच्या पोटाची चरबी कमी होत नाही.

News18
News18
Walking And Belly Fat : आजकालच्या काळात अनेक लोक वजन कमी करण्यासाठी रोज चालण्याचा व्यायाम करतात. पण अनेकदा सर्व प्रयत्न करून देखील पोटाची चरबी कमी होत नाही. पण, अनेकांना ही तक्रार असते की, रोज चालूनही त्यांच्या पोटाची चरबी कमी होत नाही. डॉक्टर आणि आरोग्य तज्ञांच्या मते, पोटाची चरबी कमी करण्यासाठी केवळ चालणे पुरेसे नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात, ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
चालणे पुरेसे नाही
चालणे हे हृदय आणि रक्ताभिसरणसाठी उत्तम आहे, पण पोटाची चरबी कमी करण्यासाठी ते पुरेसे नाही. पोटाच्या चरबीसाठी कार्डिओ सोबतच स्ट्रेंथ ट्रेनिंग आवश्यक आहे, ज्यामुळे चयापचय क्रिया वाढते.
आहार सर्वात महत्त्वाचा
तुम्ही कितीही चालले, पण जर तुमचा आहार चांगला नसेल, तर पोटाची चरबी कमी होणार नाही. जास्त साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि अनहेल्दी फॅट्स खाल्ल्याने बेली फॅट वाढते.
advertisement
तणाव आणि हार्मोन्स
सततच्या ताणामुळे शरीरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन वाढते, जे पोटाच्या भागात चरबी जमा होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे, तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करा.
झोपेचा अभाव
पुरेशी झोप न घेतल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. कमी झोप भुकेला नियंत्रित करणारे हार्मोन्स वाढवते, ज्यामुळे भूक जास्त लागते आणि वजन वाढते.
योग्य व्यायामाची निवड
पोटाची चरबी कमी करण्यासाठी फक्त चालण्यावर अवलंबून न राहता, तुमच्या वर्कआउट रूटीनमध्ये स्क्वाट्स, लंज्स आणि प्लैंक यांसारख्या व्यायामांचा समावेश करा.
advertisement
हायड्रेशन आणि जीवनशैली
पोटातील चरबी कमी करण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी पचनक्रिया सुधारते आणि शरीर हायड्रेटेड ठेवते. तसेच, निरोगी जीवनशैली पाळणे गरजेचे आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी फक्त चालणे पुरेसे नाही, तर आहार, व्यायाम, तणाव आणि झोप या सर्वांचा योग्य समतोल राखणे महत्त्वाचे आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Belly Fat : रोज चालताय तरीही होत नाही पोटाची चरबी कमी, काय आहेत नेमकी कारणं? जाणून घ्या
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement