Breast Cancer : महिलांसारखाच पुरुषांनाही होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? एक्सपर्ट सांगतात यामागची खरी कारणं

Last Updated:

कधी असा विचार केलाय का किंवा कधी असा प्रश्न पडलाय का की फक्त महिलांनाच हा कॅन्सर होता का की पुरुषांना देखील असं होतं?

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सामान्यतः स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हा आजार महिलांमध्ये आढळतो, तुम्ही त्याबद्दल ऐकलं देखील असेल. पण कधी असा विचार केलाय का किंवा कधी असा प्रश्न पडलाय का की फक्त महिलांनाच हा कॅन्सर होता का की पुरुषांना देखील असं होतं? वैद्यकीय संशोधनानुसार पुरुषांनाही हा आजार होऊ शकतो आणि काही ठिकाणी तर त्याचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर परिसरात (ग्राउंड झिरो) राहणारे आणि काम करणारे पुरुष याचे ताजे उदाहरण आहेत.
न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने आतापर्यंत 91 पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची पुष्टी केली आहे. हा आकडा 2018 च्या तुलनेत सहापट जास्त आहे आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा तब्बल 90 पट जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती चिंताजनक आहे कारण पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर फारच दुर्मिळ मानला जातो. सामान्यतः दर एक लाख पुरुषांपैकी फक्त एकालाच हा आजार होतो.
advertisement
पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर कसा होतो?
डॉक्टर सांगतात की ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त महिलांचा आजार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात जन्मापासूनच काही प्रमाणात ब्रेस्ट टिश्यू असतात. काही वेळा हे टिश्यू असामान्यरीत्या वाढू लागतात आणि तेथूनच कर्करोगाची सुरुवात होते. मायो क्लिनिकच्या माहितीनुसार, पुरुषांमध्ये हा आजार छातीतील पेशींमध्ये झालेल्या बदलांमुळे सुरू होतो. या पेशी हळूहळू वाढतात आणि शेवटी एक लंप (गाठ) किंवा ट्यूमर तयार होतो.
advertisement
कोणत्या पुरुषांना अधिक धोका असतो?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा आजार प्रामुख्याने 60 ते 70 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये दिसतो, पण कोणत्याही वयात होऊ शकतो.
CDC आणि मायो क्लिनिकच्या अहवालानुसार, खालील कारणांनी धोका वाढू शकतो
वाढतं वय
हार्मोन्समधील असंतुलन किंवा एस्ट्रोजेन थेरपी
कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास
क्लाइनफेल्टर सिंड्रोम (ज्यात पुरुषांच्या शरीरात अतिरिक्त X क्रोमोसोम असतो)
advertisement
लिव्हरच्या आजारांपैकी सिरोसिस
जास्त वजन किंवा स्थूलता, ज्यामुळे एस्ट्रोजेनचं प्रमाण वाढतं
टेस्टिकल्सशी संबंधित आजार किंवा शस्त्रक्रिया
लक्षणं जी दुर्लक्ष करू नयेत
पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं अनेकदा सुरुवातीला अगदी सौम्य असतात आणि त्यामुळे ती दुर्लक्षित होतात. पण खालील चिन्हांकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे:
छातीवर विनावेदना गाठ किंवा सूज
त्वचेवर सुरकुत्या पडणं, लालसरपणा किंवा रंग बदलणं
advertisement
निप्पलचा आकार बदलणं किंवा आत वळणं
निप्पलमधून पातळ द्रव किंवा रक्तस्राव होणं
काखेत किंवा कॉलरबोनजवळ सूज येणं
अशा कोणत्याही लक्षणांचा अनुभव दीर्घकाळ होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
बचाव आणि काळजी
हा आजार पूर्णपणे टाळणं शक्य नसले तरी काही सावधगिरीच्या उपायांनी धोका कमी करता येतो
कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास असल्यास जेनेटिक टेस्टिंग करावी.
advertisement
वजन नियंत्रित ठेवावं आणि अल्कोहोलचं सेवन मर्यादित ठेवावं.
नियमित सेल्फ-एक्झामिनेशन करून शरीरातील कोणतेही बदल वेळेवर ओळखावेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Breast Cancer : महिलांसारखाच पुरुषांनाही होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? एक्सपर्ट सांगतात यामागची खरी कारणं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement