advertisement

Men Toilet Etiquette : वापरल्यानंतर टॉयलेट शीट उचलावे की नाही? काय आहेत पुरुषांसाठीचे टॉयलेट एटिकेट

Last Updated:

आपण सर्वजण शौचालय वापरतो तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच घुमतो. टॉयलेट शीट उचलायचे की तसेच ठेवायचे? खरं तर, टॉयलेट वापरल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण विचार करतात की आपल्या हातांनी घाणेरड्या टॉयलेट शीटला स्पर्श करावा का?

News18
News18
मुंबई : कार्यालय असो, घर असो किंवा इतर कोणतेही सार्वजनिक ठिकाण. जेव्हा आपण सर्वजण शौचालय वापरतो तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच घुमतो. टॉयलेट शीट उचलायचे की तसेच ठेवायचे? खरं तर, टॉयलेट वापरल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण विचार करतात की आपल्या हातांनी घाणेरड्या टॉयलेट शीटला स्पर्श करावा का? हे योग्य आहे की नाही?
काही लोकांना वाटते टॉयलेट शीट उचलणे हा आरोग्यदायी शौचालय शिष्टाचार नाही. यामुळे इतर कोणीही त्या शौचालयाचा वापर केल्यास त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. परंतु, महिला आणि पुरुष दोघांसाठी शौचालय वापरण्याची पद्धत वेगळी आहे.
वास्तविक, या मुद्द्यावरून ब्रिटनमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. metro.co.uk या ब्रिटीश वेबसाइटवर याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत अनेकजण आपली बाजू मांडत आहेत. या अहवालात टॉयलेट शीट वापरल्यानंतर उचलणे ही आरोग्यदायी म्हणजेच हेल्दी प्रॅक्टिस असल्याचे सांगितले आहे. याबाबत सांगण्यात आले की, बहुतांश पुरुष शीट उचलायला विसरल्याचे कारण पुढे करतात. पण, हे चुकीचे आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही शीटवर बसाल तेव्हा तुम्हाला हे देखील कळले पाहिजे की, तुम्हाला ते शीट उचलायचेही आहे.
advertisement
या वादात अनेक युजर्सने आपले मत मांडले. एक युजर फ्रान्सिस म्हणाला, दोन्ही गोष्टी योग्य आहेत. आणखी एका युजरने लिहिले की, घाणेरड्या शीटला का हात लावावा. दुसऱ्या व्यक्तीचा युक्तिवाद असा आहे की, वापरल्यानंतर साबणाने हात धुणे ही एक सामान्य पद्धत आहे. आणखी एक युजर म्हणतो की, ही एक आरोग्यदायी प्रॅक्टिस आहे. वापरल्यानंतर प्रथम फ्लश केले पाहिजे आणि मग आपण शीट उचलले पाहिजे.
advertisement
हेल्दी प्रॅक्टिस म्हणजे काय?
शौचालय शिष्टाचार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. योग्य स्वच्छता राखताना तुम्ही अनेक गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत. तुम्ही सार्वजनिक शौचालय वापरत असताना, तुम्ही स्वतःच्या स्वच्छतेची तसेच इतरांच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या नंतर टॉयलेटमधे येणाऱ्या व्यक्तीला पूर्ण स्वच्छता मिळेल, अशा प्रकारे तुम्ही शौचालयाचा वापर करावा. अशावेळी ज्या व्यक्तीने तुमच्या आधी टॉयलेटचा वापर केला असेल त्यांनी स्वच्छता राखली असेल तर तुम्हालाही चांगले वाटते. त्यामुळे फ्लश करण्यासह आपण शीट उचलणे आणि कोरडे ठेवण्याचे शिष्टाचारही स्वीकारले पाहिजे.
advertisement
खरं तर, तुम्ही टॉयलेट वापरत असताना तिथून निघणारी घाण तुमचीच असते. तुम्हाला त्याचा तिरस्कार वाटू नये. ते व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर तुम्ही योग्य पद्धतीने हात धुवा. अशा परिस्थितीत इतरांना कोणतीही अडचण येत नाही आणि हा एक चांगला सराव असा आहे. जेव्हाही तुम्ही शौचालय वापरता मग तुम्ही घरात असाल किंवा सार्वजनिक ठिकाणी, तुम्ही शीट उचलली पाहिजे. हा एक आरोग्यदायी शिष्टाचार आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Men Toilet Etiquette : वापरल्यानंतर टॉयलेट शीट उचलावे की नाही? काय आहेत पुरुषांसाठीचे टॉयलेट एटिकेट
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement