advertisement

Men's Fashion : कमी कपड्यात करू शकता जास्त स्टाईल! जाणून घ्या पुरुषांच्या फॅशनसाठी 3-3-3 ची भन्नाट ट्रिक..

Last Updated:

Clothes combinations for men : या ट्रिकच्या मदतीने तुम्ही कमी कपड्यांमध्ये अनेक स्टाईल करू शकता. जी प्रत्येकवेळी वेगळी दिसेल आणि तितकीच कूलदेखील. तसेच तुम्हाला व्रणावर कपडे विकत घेण्याचीही गरज पडणार नाही.

काय आहे 3-3-3 ची ट्रिक?
काय आहे 3-3-3 ची ट्रिक?
मुंबई : पुरुषांच्या कपड्यांबद्दल, त्यांच्या स्टाईलबद्दल फार मोठे प्रश्न असतात. त्यातही मोठा प्रश्न म्हणजे वेगळं काय करावं. जीन्स, शर्ट, टीशर्ट, जॅकेट किंवा कधीतरी कुर्ता पायजामा.. एवढेच काय ते चॉइसेस. यातूनच नेहमी नवीन काय घालावं. असा प्रश्न असतो. आज तुमच्या या प्रॉब्लेमच सोल्युशन आम्ही घेऊन आलो आहोत.
कपड्यांबद्दल सांगणारी एक वेबसाईट trendalytics.co मध्ये दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही 3-3-3 हा नियम वापरून तुमच्या कपड्यांचे स्टाईल सेट करू शकता. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही कमी कपड्यांमध्ये अनेक स्टाईल करू शकता. जी प्रत्येकवेळी वेगळी दिसेल आणि तितकीच कूलदेखील. तसेच तुम्हाला वारंवार कपडे विकत घेण्याचीही गरज पडणार नाही.
काय आहे 3-3-3 ची ट्रिक?
तुम्हाला नेहमी कोणते कपडे घालावे? हे तर मी नेहमीच घालतो.. किंवा आज वेगळं काहीतरी हवंय.. असं वाटत असेल तर ही ट्रिक तुमच्या खूप फायद्याची आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे 3-3-3 या ट्रेकने सेट करायचे आहे. हे खूप सोपे फक्त तुम्हाला तुमच्या कपाटातून हुशारीने कपड्यांची निवड करावी लागेल.
advertisement
फॉलो करा ही ट्रिक..
- सर्वात आधी तुमच्या कपातून कपडे बाहेर काढा आणि बेडवर ठेवा. यामुळे तुमच्याकडे कोणकोणते आणि किती कपडे आहेत हे स्पष्टपणे कळेल.
- त्यानंतर तुमचे आवडते कपडे निवडा. तुमचे आवडते टॉप 3 शर्ट-टीशर्ट, 3 बॉटम आणि तुम्हाला कम्फर्टेबल असलेले 3 जोडी शूज निवडा.
- तुमचे हे 9 पीस सहजपणे मिक्स आणि मॅच होऊ शकतात की नाही याची खात्री करा. काळा, पांढरा, बेज, नेव्ही किंवा राखाडी रंगांसारखे रंग निवडा.
advertisement
- हे कपडे मिक्स अँड मॅच करून तुम्ही किती लुक बनवू शकता हे पाहा. प्रत्येक कॉम्बिनेशन ट्रे करून पाहा आणि ठरवा.
- हवे असल्या तुम्ही त्यावर वेगवेगळ्या ऍक्सीसरीज घेऊ शकता. जसे की, स्कार्फ, बेल्ट किंवा हॅट. जे तुम्हाला आवडत असेल.
अशाच प्रकारे तुम्ही इतरही काही कॉम्बिनेशन ट्राय करून पाहू शकता. तुमचा कदाचित एक दिवस यामध्ये जाईल. पण सकाळी होणारी धावपळ आणि मनस्ताप कमी होई. तुम्हाला माहित असेल कि आज कोणत्या पॅन्टसोबत कोणता शर्ट किंवा टीशर्ट घालायचा आहे आणि कोणता शूज..
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Men's Fashion : कमी कपड्यात करू शकता जास्त स्टाईल! जाणून घ्या पुरुषांच्या फॅशनसाठी 3-3-3 ची भन्नाट ट्रिक..
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement