मुंबईकरांनो सावधान! शहरात पुन्हा कोरोना, पुन्हा लॉकडाऊन? सरकारच्या रिपोर्टने खळबळ, डॉक्टरांनीही केलं अलर्ट

Last Updated:

Mumbai Coronavirus : चीन, थायलँड, सिंगापूरनंतर आता भारतात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. विशेषतः देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाची प्रकरणं वाढली आहेत. त्यामुळे आता चिंता वाढली आहे.

News18
News18
मुंबई : कोरोना आता संपला, असंच सगळ्यांना वाटत असेल. पण काही आशियाई देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. यामध्ये चीन, थायलँड, सिंगापूरचा समावेश आहे. या देशांनंतर आता भारतातही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. विशेषतः देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाची प्रकरणं वाढली आहेत. त्यामुळे आता चिंता वाढली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या देशभरात 93 सक्रिय रुग्ण आहेत. हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर मुंबईच्या रुग्णालयातही कोविड-19 चे रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण वाढल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. कोविडचे रुग्ण आतापर्यंत सौम्य आहेत हेसुद्धा डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
डॉ. प्रीत समदानी यांनी गेल्या काही दिवसांत अर्धा डझनहून अधिक प्रकरणं पाहिली आहेत. ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉ. हेमंत ठाकर म्हणाले की, शनिवारी सकाळी त्यांना दोन रुग्णांचे पॉझिटिव्ह निकाल मिळाले. हाँगकाँग आणि सिंगापूरच्या जास्त घनतेच्या भागात कोविडची नवीन लाट आल्याची बातमी येत असताना माझ्या एका रुग्णाला काही दिवसांपूर्वीच लंडनहून परत आणलं आहे आणि त्याला घशाचा संसर्ग आणि खोकला गंभीर आहे. दुसऱ्या रुग्णाचा तात्काळ प्रवासाचा इतिहास नाही, असं ते म्हणाले.
advertisement
बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह म्हणाल्या की, कोविडला कारणीभूत असलेला कोरोनाव्हायरस देशात स्थानिक असल्याने आम्हाला दरमहा सात ते नऊ रुग्ण आढळतात. बीएमसीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आधीच त्यांच्या डॉक्टरांना तापाच्या रुग्णांबद्दल सतर्क राहण्यास सांगितलं आहे. कोविडच्या बाबतीत काळजी करण्याचं कारण नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मुंबईकरांनो सावधान! शहरात पुन्हा कोरोना, पुन्हा लॉकडाऊन? सरकारच्या रिपोर्टने खळबळ, डॉक्टरांनीही केलं अलर्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement