कोरोनाच्या नव्या व्हेरियंटपासून कसा बचाव कराल? डाॅक्टरांनी सांगितले 'हे' महत्त्वाचे उपाय!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
कोरोनाच्या नव्या व्हेरियंट्सच्या वाढत्या धोक्यावर आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सुनीरा बंगा यांनी उपाय सुचवले आहेत. त्यांच्या मते, पंचकर्म, ऑइल पुलिंग, नाकात गाईचे तूप टाकणे आणि...
भारतात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. रोज नवीन केसेस समोर येत असल्याने केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारपर्यंत सगळेच चिंतेत आहेत. कोरोनाच्या NB.1.8.1 आणि LF.7 या दोन नव्या व्हेरियंट्सबद्दल मोठे ॲलोपॅथिक डॉक्टरही आपले मत मांडत आहेत आणि लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. परंतु यावर आयुर्वेदिक तज्ज्ञ काही उपाय सांगत आहेत, ते आपण या लेखात सविस्तर पाहुया...
प्रतिकारशक्ती कशी वाढवाल?
आयुर्वेदिक डाॅक्टर सुनीरा बंगा सांगतात की, "कोरोना टाळायचा असेल, तर प्रतिकारशक्ती वाढवणं हा उत्तम उपाय आहे. पंचकर्म उपाय करून तुम्ही प्रतिकारशक्ती वाढवू शकता. तुम्ही पंचकर्म आयुर्वेदिक उपचार आणि ऑयल पुलिंग केलं की, प्रतिकारशक्ती वाढू शकते. त्याचबरोबर रोज 1-2 थेंब नाकात गाईचे शुद्ध तूप सोडू शकता, तसेच सहज पचेल असे अन्न खा, ज्यामुळे शौचास त्रास होणार नाही.
advertisement
कोरोनानंतरची धोकादायक लक्षणं
डॉ. सुनीरा सांगतात की, "कोरोनानंतर 'पोस्ट कोविड सिम्पटम्स' म्हणजेच कोरोनानंतर दिसणारी लक्षणे नेहमीच सर्वात घातक असतात. यामुळेच अनेक मृत्यूही झाले आहेत. त्यावर आयुर्वेदात ‘वमन’ ही एक पंचकर्म प्रक्रिया आहे, जी शरीरातील जास्त कफ दोष उलटीद्वारे बाहेर काढण्यासाठी केली जाते. त्यांनी ही प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितली: या प्रक्रियेत, त्या रुग्णाला एक प्रकारचे औषधी तूप प्यायला देतात आणि जोपर्यंत रुग्णाला काही प्रकारची लक्षणे दिसू लागत नाहीत तोपर्यंत त्याला ते प्यायला देतात. त्यानंतर रुग्णाला रुग्णालयात आणले जाते आणि काही औषधी वनस्पतींच्या मदतीने उलटी करवली जाते, जेणेकरून त्याच्या पोटात आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात."
advertisement
शेवटी, त्या म्हणाल्या की, जी कोणतीही व्यक्ती ही प्रक्रिया करते, ती पोस्ट-कोविड लक्षणांपासून वाचू शकते आणि जर एखाद्याला पोस्ट-कोविड लक्षणे असतील तरी त्याची लक्षणे इतर कोणत्याही रुग्णापेक्षा खूप कमी असतील.
हे ही वाचा : Snake Bite: पावसाच्या पाण्यात दंश मारला तरी कळणार नाही, साप विषारी की बिनविषारी कसा ओळखायचा?
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 09, 2025 1:23 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटपासून कसा बचाव कराल? डाॅक्टरांनी सांगितले 'हे' महत्त्वाचे उपाय!