‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा धोका जास्त! संशोधनात धक्कादायक खुलासा; तुमचा रक्तगट यात आहे का?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
जनुकीय अभ्यासांवर आधारित संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, 'हा' रक्तगट असलेल्या लोकांना 60 वर्षांपूर्वी स्ट्रोक येण्याचा धोका इतरांपेक्षा 16% अधिक असतो. O रक्तगट असलेल्यांमध्ये...
एका मोठ्या जेनेटिक अभ्यासातून रक्तगट आणि लवकर येणाऱ्या स्ट्रोकच्या (पक्षाघात) धोक्यामध्ये स्पष्ट संबंध दिसून आला आहे. विशेषतः, संशोधकांनी इशारा दिला आहे की, 'A' रक्तगट असलेल्या लोकांना 60 वर्षांपूर्वी स्ट्रोक येण्याची शक्यता 16% जास्त असते. त्याच वेळी, 'O' रक्तगट असलेल्या लोकांना हा धोका 12% कमी असल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे.
48 वेगवेगळ्या जेनेटिक अभ्यासांच्या आकडेवारीवर आधारित हे निष्कर्ष आहेत. यात 18 ते 59 वयोगटातील 17000 स्ट्रोक रुग्ण आणि 600000 निरोगी व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी ABO रक्तगट जनुके आणि स्ट्रोकशी संबंधित जनुके यांच्यातील संबंध तपासला, ज्यामध्ये स्ट्रोक नसलेल्या आणि स्ट्रोक झालेल्या व्यक्तींची तुलना केली.
2022 मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे आढळले आहे की, जेनेटिक स्तरावर, 'A' रक्तगट असलेल्या लोकांमध्ये वॉन विलेब्रँड फॅक्टर (vWF) आणि फॅक्टर VIII या रक्त गोठण्यास मदत करणाऱ्या घटकांची पातळी जास्त असते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची आणि पर्यायाने स्ट्रोकचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांना वाटते.
advertisement
याबाबत अधिक माहिती अशी
- 'A' रक्तगट असलेल्या लोकांना स्ट्रोक येण्याची शक्यता जास्त असते.
- 'O' रक्तगट सुरक्षित मानला जातो.
- 'B' आणि 'AB' रक्तगटांमध्ये कमी किंवा संमिश्र धोके असू शकतात.
या अभ्यासाचा मुख्य मुद्दा असा आहे की, जरी ही वाढ कमी असली तरी, लवकर येणाऱ्या स्ट्रोकसाठी हे एक महत्त्वाचे 'मार्कर' (सूचक) मानले जाते. मात्र, याचा अर्थ असा नाही की लसीकरण किंवा अतिरिक्त तपासणीची गरज आहे, असे तज्ज्ञ सांगतात. संशोधकांच्या मते, "जरी हा मोठा इशारा नसला तरी, तरुण वयात स्ट्रोकच्या धोक्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही."
advertisement
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडचे व्हॅस्कुलर न्यूरोलॉजिस्ट आणि फिजिशियन स्टीव्हन किडनर म्हणतात, "रक्तगट 'A' ला जास्त धोका का आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण रक्ताच्या गुठळ्या होणे आणि शारीरिक प्रक्रिया यात भूमिका बजावू शकतात." अशा जेनेटिक-आधारित धोके बदलता येत नसले तरी, उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान आणि लठ्ठपणा यांसारख्या घटकांवर नियंत्रण ठेवून स्ट्रोकचा धोका कमी करता येतो, असे संशोधक सांगतात.
advertisement
हे ही वाचा : पावसाळ्यात येताहेत त्वचेच्या समस्या? फाॅलो करा 'या' 5 टिप्स; पिंपल्स-रॅशेस होतील गायब, चेहऱ्यावर येईल ग्लो!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 27, 2025 2:55 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा धोका जास्त! संशोधनात धक्कादायक खुलासा; तुमचा रक्तगट यात आहे का?