71 वर्षांच्या आजोबांना लावलं डुकराचं लिव्हर अन् झाला चमत्कार, 5 महिन्यांनी...; जगात पहिल्यांदाच असं घडलं

Last Updated:

Pig liver transplant in human body : तुम्ही कधी एखाद्या प्राण्याचं अवयव माणसाच्या शरीरात प्रत्यारोपित केल्याचं ऐकलं आहे का? पण असा प्रयोग करण्यात आला आणि नंतर चमत्कारच घडलं.

News18
News18
नवी दिल्ली : अवयव प्रत्यारोपण किंवा ऑर्गेन ट्रान्सप्लांट आता काही तुमच्यासाठी नवीन नाही. एका व्यक्तीच्या शरीरातील काही अवयव दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करता येतात हे तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याचं अवयव माणसाच्या शरीरात प्रत्यारोपित केल्याचं ऐकलं आहे का? पण असा प्रयोग करण्यात आला आणि नंतर चमत्कारच घडला.
advertisement
71 वर्षांचा हा पुरुष. ज्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट झालं. त्याच्या शरीरात कुणा माणसाचं नाही तर चक्क डुकराचं लिव्हर प्रत्यारोपित करण्यात आलं. रुग्णाला हेपेटायटीस बी-संबंधित लिव्हर सिरोसिस आणि  लिव्हर ट्यूमर होता. इतर सर्व उपचार पर्याय संपल्यानंतरच डॉक्टरांनी हे पाऊल उचललं.
अनुवंशिकरित्या सुधारित डुकराचं यकृत त्याच्या शरीरात ट्रान्सप्लांट केलं गेलं. क्लोन केलेले डुक्कर म्हणजे ज्यांच्यामध्ये मानवी शरीरात संसर्ग टाळण्यासाठी आणि मानवी शरीर ते स्वीकारण्यासाठी 10 जीन्स संपादित करण्यात आल्या होत्या.
advertisement
यकृताचं प्रत्यारोपण झाल्यानंतर ते लगेच कार्य करू लागलं. रक्त फिल्टर करणं, पित्त तयार करणं आणि शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकणं सुरू केलं.  डॉक्टरांनी सांगितलं की शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सुरुवातीच्या काळात कोणतीही गुंतागुंत झाली नाही आणि सर्व महत्वाची कार्ये सामान्य राहिली. पण काही दिवसांनी समस्या निर्माण झाली. सुमारे 38 दिवसांनंतर रुग्णाचं यकृत पुन्हा कार्य करू लागले, त्यानंतर डॉक्टरांनी डुकराचं यकृत काढून टाकलं.
advertisement
ही शस्त्रक्रिया मे 2024 मध्ये झाली. हा रुग्ण 171 दिवस म्हणजे जवळजवळ 5 महिने जगला. डुकराचं यकृत मिळाल्यानंतर माणूस इतका दिवस जगण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनमधील अनहुई मेडिकल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला आहे. चिनी डॉक्टरांनी विज्ञानासाठी पूर्वी अशक्य मानली जाणारी एक कामगिरी केली आहे.
advertisement
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे यश झेनोट्रान्सप्लांटेशन म्हणजे प्राण्यांच्या अवयवांचे मानवांमध्ये प्रत्यारोपण करणं, यामधील सर्वात मोठ्या यशांपैकी एक आहे.  यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आपले प्राण गमावणाऱ्या लाखो लोकांना हा प्रयोग मोठी आशा देतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मानवी दात्याचे यकृत उपलब्ध होईपर्यंत डुकराचं यकृत तात्पुरतं मानवांमध्ये वापरलं जाऊ शकतं, असं या प्रयोगातून असं सिद्ध होतं. जगभरात लाखो रुग्ण यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. जर डुकरांच्या अवयवांचा सुरक्षित वापर शक्य झाला तर भविष्यात हजारो जीव वाचू शकतील.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
71 वर्षांच्या आजोबांना लावलं डुकराचं लिव्हर अन् झाला चमत्कार, 5 महिन्यांनी...; जगात पहिल्यांदाच असं घडलं
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement