Pippali Benefits: इतक्या आजारांवर गुणकारी आहे पिंपळी, एकदा खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health Benefits of Pippali in Marathi: पिंपळी दिसायला काळ्या लाकडाप्रमाणे आणि लवंगासारखी दिसते. ही एक अतिशय छोटी वनस्पती जरी असली तरीही विविध आजारांवर प्रचंड गुणकारी असून औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.
मुंबई : 5 वर्षांपूर्वी जेव्हा कोरोना व्हायरसने जगाला आपली मगरमिठी मारायला सुरूवात केली होती. तेव्हा भारतीयांना आर्युवेदीक औषधांचं महत्त्व पटू लागलं होतं. आयुर्वेदातल्या विविध औषधी वनस्पतींचं सेवन करून प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न भारतीय नागरिक करत होते. आयुष मंत्रालयानेही आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने काही आयुर्वेदिक वनस्पतींचा अभ्यास केला होता. यात काही वनस्पती या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरल्याचं सिद्ध झालं होतं. अशीच एक आयुर्वेदिक वनस्पती आहे पिंपळी किंवा पिप्पली. पिप्पली दिसायला काळ्या लाकडाप्रमाणे आणि लवंगासारखी दिसते. ही एक अतिशय छोटी वनस्पती जरी असली तरीही विविध आजारांवर प्रचंड गुणकारी असून औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.
जाणून घेऊयात पिंपळीच्या फायद्यांबद्दल.
आयुर्वेदानुसार, पिपली दमा, ब्राँकायटिस आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये देखील प्रभावी ठरू शकते. ज्या लोकांना खोकला आणि कफची समस्या आहे ते पिंपळीचं सेवन करू शकतात. पिंपळीच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, ते वेदनाशमक म्हणून काम करतं. यामुळे सांध्यातील वेदना आणि सूज कमी होऊ शकते. सुश्रुत संहितेत याला दहन उपकर्ण म्हणून ओळखले जाते.
advertisement
त्वचा विकारांवर फायदेशीर :
विविध त्वचा विकारांवर पिंपळी फायदेशीर आहे. पिंपळीमुळे रक्त शुद्ध व्हायला मदत होते, ज्यामुळे मुरुम आणि खाज सुटण्याची समस्या कमी होते. पिंपळीच्या वापरामुळे अनेक त्वचाविकार मुळापासून दूर व्हायला मदत होतात. मात्र तज्ञांच्या सल्ल्याशिवाय पिप्पलीचं सेवन करू नये.

advertisement
कॅन्सरवर गुणकारी:
पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये केलेल्या संशोधनात असं म्हटलं आहे की, भारतात आढळणाऱ्या पिंपळीमध्ये पायपरलाँगुमाइन नावाचं रासायनिक संयुग असतं. हे संयुग कर्करोगाच्या पेशी मारण्यास मदत करतं. याशिवाय पायपरलाँगुमाइन हे ट्यूमर पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतं. यात ब्रेन ट्यूमरच्या पेशींचाही समावेश आहे. मेंदूच्या कर्करोगाचा सर्वात घातक आणि धोकादायक प्रकार असलेल्या ग्लिओब्लास्टोमावरही पिंपळी प्रभावी असल्याचं संशोधनात नमूद करण्यात आलंय.
advertisement
रोगप्रतिकारक शक्तीवर्धक:
पिंपळीच्या फळं आणि मुळांचा वापर सर्वाधिक केला जातो. त्याची मुळं आणि देठाचे जाड भाग कापून वाळवले जातात. यामुळे चयापचय सुधारायला मदत होते. दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पिंपळीमुळे जळजळ कमी होण्यास मदत होते. याशिवाय पिप्पलीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी पिंपळी फायद्याची आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने पिंपळीची पावडर मध किंवा पाण्याबरोबर सेवन केल्याने मूत्रपिंड निरोगी राहायला मदत होते. पिंपळीच्या सेवनाने चयापचय सुधारतं. त्यामुळे वजन देखील कमी व्हायला मदत होते. पिंपळीच्या सेवनामुळे पचनसंस्थेपासून ते श्वसनसंस्थेपर्यंतच्या अनेक आजारांना दूर ठेवता येतं. मात्र पिंपळी ही उष्ण स्वभावाची आहे. त्यामुळे ती फक्त हिवाळ्यात खाणं फायद्याचं ठरू शकतं. याशिवाय गर्भवती महिलांनी पिंपळीचं सेवन करणं टाळावं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 11, 2025 3:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pippali Benefits: इतक्या आजारांवर गुणकारी आहे पिंपळी, एकदा खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे