अस्सल चिकनकारी कुर्तीची करायचीय खरेदी? पुण्यातील या मार्केटला द्या भेट
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पुण्यातील या मार्केटमध्ये तुम्हाला अस्सल चिकनकारी कुर्तीची खरेदी करता येईल.
पुणे, 26 सप्टेंबर : चिकनकारी कुर्ती हा एक पारंपारिक भारतीय पोशाखा मधील प्रकार आहे. जो लखनऊ उत्तर प्रदेश येथे तयार होतो. कापूस, जॉर्जेट किंवा शिफॉन सारख्या हलक्या वजनाच्या कपड्यांवर पांढरा धागा वापरून हाताने बनवलेल्या भरतकामासाठी चिकनकारी कुर्ती ओळखली जाते. यालाच लखनवी असे ही म्हंटले जाते. सध्या चिकनकारी कुर्ती हे मोठ्या प्रमाणावर तरुणी वापरताना पाहिला मिळतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी पुण्यातील बेस्ट चिकनकारी कुर्तीचे आकर्षक कलेक्श कुठे मिळेल? या विषयी माहिती सांगणार आहोत.
कुठे कराल खरेदी?
पुणे शहरातील तरुणाईच आकर्षण म्हणजेच एफसी रोड वरील मार्केट आहे. या ठिकाणच्या लखनऊ चिकन पॅलेस या दुकानात तुम्हाला अतिशय सुंदर आणि वजनाने हलक्या असलेल्या नियमित वापरासाठी बेस्ट अशा कुर्तीज पाहिला मिळतील. तुम्ही या कुर्ती स्पेशल कार्यक्रमासाठी देखील ट्राय करू शकता. या सर्व कुर्ती दिसायलाही अतिशय स्टायलिश असून वापरायलाही छान आहेत. तुम्हाला यावर अतिशय आकर्षक एम्ब्रॉयडरी वर्क केललं पाहिला मिळतं.
advertisement
चिकनकारी कुर्ती कशी बनवली जाते?
चिकनकारी हे पूर्णपणे हाताने बनवले जाते. ते कापड विणणं हे कौशल्य असून अतिशय बारीक सुईने हे सुंदर विणकाम केलं जातं. चिकनकारीचे काम करण्यासाठी खूप वेळ मेहनत घ्यावी लागते. ज्यामुळे ते कापड अधिकच आकर्षक आणि सुंदर दिसतं. आजकाल मशिनवर चिकनकारी कापडाचे काम केले जाते. या कुर्ती बनवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या कॉटन, शिफॉन, मलमल, रेशम, ऑर्गेना, नेटचा वापर केला जातो. त्यामुळे या अतिशय आरामदायक मानल्या जातात. यामुळे ग्राहकांकडून पसंती देखील मिळते, असं लखनऊ चिकन पॅलेसचे मालक शंतनू पानसरे सांगतात.
advertisement
काय आहे किंमत?
एक्सक्लॉसिव्ह लखनऊ पुण्यात आम्ही सुरुवातीला सुरु केले. 25 वर्ष झालं आमचं हे दुकान आहे. याच्यामध्ये संपूर्ण हाताने काम केले जाते. कॉटन, जॉरजेट, टसर सिल्क, आणि आता नवीन आलेलं मोनाल फॅब्रिक, चंदेरीवर लखनवी, मसलीमवर देखील लखनवी केलं आहे. काही ड्रेस मटेरियल पण भेटत. तसंच प्रिंटेड वर पण लखनवी करून घेत आहोत. अशा विविध प्रकारचे लखनवी कुर्ती इथे पाहिला मिळतील. या चिकन कुर्तीची किंमत 850 रुपयांपासून 2200 रुपयांपर्यंत आहे अशी माहिती शंतनू पानसरे यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 26, 2023 5:09 PM IST