advertisement

kakdichi Tambli Recipe : जेवणाला येईल लज्जतदार चव, घरीच बनवा कमी साहित्यात काकडीची तंबळी, रेसिपीचा Video

Last Updated:

कोकणी चवीचा हलकासा सुगंध आणि दक्षिण भारतीय फोडणीची खास लय यांचा सुंदर मिलाफ असलेली ही तंबळी गरम भातासोबत फारच लज्जतदार लागते.

+
झटपट

झटपट तयार होणारी स्वादिष्ट आणि चमचमीत काकडीची तंबळी.

मुंबई : स्वादिष्ट आणि पारंपरिक पदार्थांपैकी काकडीची तंबळी हा एक उल्लेखनीय दक्षिण भारतीय पदार्थ असून कोकणातही तो तितकाच प्रेमाने बनवला जातो. कोकणी चवीचा हलकासा सुगंध आणि दक्षिण भारतीय फोडणीची खास लय यांचा सुंदर मिलाफ असलेली ही तंबळी गरम भातासोबत फारच लज्जतदार लागते. तर चला कमी साहित्य वापरून ही कशी बनवता येईल ते बघूया.
काकडीची तंबळी साहित्य
1 मध्यम आकाराची काकडी (सालीसकट, बारीक चिरलेली/किसलेली)
½ कप किसलेले नारळ
½ चमचा जिरे
अर्धी वाटी दही
मीठ चवीनुसार
साखर चवीनुसार
मिरे
लसूण 4-5 पाकळ्या
अद्रक थोडेसे
कोथिंबीर
फोडणीसाठी:
1 चमचा तेल
½ चमचा मोहरी
1–2 सुक्या लाल मिरच्या
थोडीशी कढीपत्ता पाने
जिरे
काकडीची तंबळी कृती
काकडी बारीक चिरून किंवा किसून घ्या. त्यात कोथिंबीर, खोबरे, मिरे, लसूण, अद्रक आणि मीठ एकत्र करून थोडेसे पाणी घालून जाडसर पेस्ट करा. ही पेस्ट चटणीसारखी पण थोडी घट्ट असावी. या पेस्टमध्ये अर्धी वाटी दही टाका आणि चवीप्रमाणे मीठ, साखर घालून एकजीव करा.
advertisement
छोट्या कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी टाकून फुटू द्या. मग सुकी लाल मिरची, जिरे व कढीपत्ता घालून एक छान फोडणी वास येईल तोवर तडतडा. ही फोडणी तंबळीवर ओतून हलकेच मिसळा. आपली तंबळी तयार झाली.
advertisement
सर्व्हिंग टिप: ही तंबळी गरम भात, मोठी पोळी, किंवा धान्याच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
kakdichi Tambli Recipe : जेवणाला येईल लज्जतदार चव, घरीच बनवा कमी साहित्यात काकडीची तंबळी, रेसिपीचा Video
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement