खान्देशात खापरावर बनवली जाते मोठ्या आकाराची पुरणपोळी; रेसिपी तुम्हाला माहितीये का?

Last Updated:

राज्याच्या प्रत्येक भागात ही बनवण्याची खास पद्धत आहे. खान्देशात मोठ्या आकाराची पुरणपोळी बनवली जाते.

+
News18

News18

पुणे, 26 डिसेंबर : पुरणपोळी हा संपूर्ण महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमधील महत्त्वाचा पदार्थ आहे. राज्याच्या प्रत्येक भागात ही बनवण्याची खास पद्धत आहे. खान्देशात मोठ्या आकाराची पुरणपोळी बनवली जाते. त्याला मांडे असं म्हणतात. हे पुरणाचे मांडे नेमके कसे बनवले जातात पाहूया.
मांडे बनवणे कौशल्याचे काम
अगदी रेशमासारखे मऊ, पातळ, तोंडात पडताच विरघळणारे हे पुरणाचे मांडे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची ठसठशीत ओळख बनले आहे. हे मांडे बनवणे म्हणजे अत्यंत कौशल्याचे काम आहे. सुगरणीची ती ओळख आहे. हे पुरणाचे मांडे बनवण्यासाठी लोकवान गहू, तेल, मीठ, हरभरा डाळ, गूळ, वेलची पूड, जायफळ  इतके पदार्थ लागतात, अशी माहिती भारती पवार यांनी दिली.
advertisement
कसे बनवले जातात मांडे?
प्रथम गव्हाचे पीठ बारीक दळून घ्यावे नंतर कापडाने गाळून घ्यावे. पिठात मीठ आणि तेल घालून भिजत ठेवावे. डाळ शिजवुन घ्यावी पाणी काढून शिजलेल्या डाळीत गुळ घालून त्याचं पुरण बनवून घ्यावं. नंतर पिठाचे गोळे करून परातीत बाजरीचे पीठ पसरवून त्यात ठेवावे आणि गोळ्यामध्ये पुरण ठेवून पोळी थोडी लाटून घ्यावी आणि नंतर हातावर गोल फिरवून मोठी करावी. खापरावर टाकून शेकावी. मांडे भाजायचे.
advertisement
वाफवलेले तुरीचे दाणे आणि शेंगदाण्याचा कूट, कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची अशी करा घरीच भाजी
हे खापर म्हणजे खास मांडे भाजण्यासाठी बनवलेलेल मातीचे भांडे, साधारण 150-200 रुपये पर्यंत किंमत असलेले हे मडके दिसायला दोन बशा एकमेकींवर उपड्या ठेवल्या तर जशा दिसतील तसे दिसते. त्याला खालच्या बाजुने तोंड असते. तिच्यातुन धग वरपर्यंत पोचुन मांडे भाजले जातात. त्यांनंतर चांगली शेकली गेली की हळूच काढून चांगले तुप लावुन घडी घालून झाकून ठेवावी. पुरणाचे मांडे तुम्ही कटाची आमटी, गुळवणी, आमरस, तूप यांच्या सोबत तुम्ही अस्सल खापरावरच्या मऊसूत पुरणपोळीचा आस्वाद घेऊ शकता, अशीही माहिती भारती पवार यांनी दिलीये.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
खान्देशात खापरावर बनवली जाते मोठ्या आकाराची पुरणपोळी; रेसिपी तुम्हाला माहितीये का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement