वर्षभर टिकेल असं कैरीचं लोणचं, रेसिपी एकदम सोपी! सर्वजण बोटं चाटत खातील

Last Updated:

काहीजणांना लिंबाचं लोणचं आवडतं, तर काहीजणांना मिरचीचं लोणचं आवडतं. आंब्याचं लोणचं मात्र सर्वजण आवडीने खातात.

आंब्याचं लोणचं सर्वजण आवडीने खातात.
आंब्याचं लोणचं सर्वजण आवडीने खातात.
अहमदाबाद : उन्हाळा म्हणजे आंबे. बाजारात आता आंबे यायला सुरूवात झाली आहे. तुम्हाला लोणचं बनवायचं असेल तर आज आपण एकदम सोपी, जबरदस्त अशी रेसिपी पाहणार आहोत. मग वर्षभर पाहायला नको. लोणचं खराब होणार नाही.
जेवणात वरण-भाताबरोबर लोणचं असेल तर भाजीची गरज पडत नाही. काहीजणांना लिंबाचं लोणचं आवडतं, तर काहीजणांना मिरचीचं लोणचं आवडतं. परंतु आंब्याचं लोणचं मात्र सर्वजण आवडीने खातात. अहमदाबादमधील आंबावाडीत राहणाऱ्या दक्षा पताडिया यांनी आंब्याची एक लय भारी रेसिपी सांगितली आहे. ती सविस्तरपणे जाणून घेऊया.
आंब्याचं लोणचं बनवण्यासाठी साहित्य खालीलप्रमाणे:
200 ग्रॅम कैरी, 200 ग्रॅम मोहोरीचं तेल, 100 ग्रॅम मेथी, 50 ग्रॅम मोहोरी, 2 चमचे मीठ, 4 चमचे लाल मिरची पावडर, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, इत्यादी.
advertisement
आंब्याचं लोणचं बनवण्याची कृती खालीलप्रमाणे:
सुरुवातीला 200 ग्रॅम मोहोरीचं तेल पॅनमध्ये गरम करा. त्यात 100 ग्रॅम मेथीचे दाणे आणि 50 ग्रॅम मोहोरी घाला. मग हळद, मीठ आणि हिंग घालून मिश्रण ढवळा. मोहोरीचं तेल पूर्ण तापलं की त्यात मसाले घाला, ढवळा आणि मग थंड होऊद्या. मसाले पूर्ण थंड झाल्यावर त्यात मिरची घालून ढवळा. 
advertisement
आता आंबे कापून घ्या. आंब्याच्या तुकड्यांना मसाला व्यवस्थित चोळा. आंबे पुरते मसाल्यात बुडाल्यावर ते एका काचेच्या बाटलीत बंद करा. आता आंबे, मसाले आणि तेल एकजीव होऊद्या. लक्षात घ्या, या बाटलीत हवा जायला नको. 3-4 दिवस ही बाटली ठेवल्यानंतर स्वादिष्ट असं लोणचं खाण्यासाठी तयार होईल. 
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
वर्षभर टिकेल असं कैरीचं लोणचं, रेसिपी एकदम सोपी! सर्वजण बोटं चाटत खातील
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement