Adulterated Panner: पनीर खाण्यापूर्वी घ्या ‘ही’ काळजी; तुमच्या पनीरमध्ये भेसळ तर नाही ? शुद्ध पनीर ओळखायचं कसं ?

Last Updated:

Adulterated Panner: पनीर हा एक दुग्धजन्य पदार्थ आहे. त्यामुळे जर दुधात भेसळ असेल तर त्या दुधापासून बनवलेल्या पनीरमध्ये भेसळ ही असणारचं. असं पनीर खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. जाणून घेऊयात पनीरमधली भेसळ ओळखायच्या या सोप्या घरगुती टिप्स् तरी कशी

प्रतिकात्मक फोटो : तुमच्या पनीरमध्ये भेसळ तर नाही? शुद्ध पनीर ओळखायचं कसं ?
प्रतिकात्मक फोटो : तुमच्या पनीरमध्ये भेसळ तर नाही? शुद्ध पनीर ओळखायचं कसं ?
मुंबई: पनीर...एक दुग्धजन्य पदार्थ. मात्र तरीही दुधापेक्षा जास्त फायदे हे पनीरचे आहेत. लहानमुलांपासून मोठ्यां व्यक्ती पनीर आवडीनं खातात. मग ती पनीरची भाजी असो की पनीर पराठा किंवा पनीर बिर्यांनी. सांगायाचा उद्देश इतकाच ही पनीरचा वापर हा भात, भाजी, पोळी इतकंच काय तर मद्यपान करताना चखणा म्हणूनही केला जातो. फ्राय पनीर हा तर अनेकांचा जीवप्राण. पनीर खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. मात्र तुम्हाला हे माहितीये का की पनीरमध्ये भेसळ होऊ शकते. जर तुमच्या खाण्यात असं भेसळयुक्त पनीर आलं तर तुमच्या शरीराला फायद्याऐवजी नुकसानच होईल.
सणासुदीच्या काळात मिठाईमध्ये भेसळ होण्याचं प्रमाण आणि भेसळखोरांवर कारवाईचं प्रमाण वाढतं. मात्र दूधाचं काय? पिशवीतल्या दुधात होणारी भेसळ हा एक सामान्य प्रकार झालाय. आधी सांगितल्या प्रमाणे पनीर हा एक दुग्धजन्य पदार्थ आहे. त्यामुळे जर दुधात भेसळ असेल तर त्या दुधापासून बनवलेलं पनीर खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही खात असलेलं पनीर भेसळमुक्त असणं गरजेचं आहे.
advertisement

दाबून पहा

खरेदी करताना पनीर हलक्या हातांना दाबून पहा. जर पनीर शुद्ध असेल तर दाबल्यानंतर त्यातून थोडं पाणी बाहेर येईल. मात्र जर त्यात भेसळ असेल तर ते तुटेल. त्यामुळे तुम्ही खरेदी करत असलेलं पनीर खरंच शुद्ध आहे का हे तुम्हाला लगेच कळून येईल.
advertisement

सोयाबीन पावडर

पनीरचा छोटा तुकडा गरम पाण्यात उकळवा. थंड झाल्यानंतर त्यात थोडी सोयाबीन पावडर टाका. जर पनीरने आपला पांढरा रंग बदलला, आणि ते लाल रंगाचं झालं तर समजून जा की ज्या दुधापासून हे पनीर तयार केलंय त्यात डिटर्जंट किंवा युरिया मिसळलेला आहे.

हे सुद्धा वाचा:

आयोडीन

पनीरमधील भेसळ ओळखण्यासाटी टिंक्चर आयोडिन एक उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला पनीर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात पनीरचे तुकडे उकळवून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर त्यात टिंक्चर आयोडिनचे काही थेंब टाका. जर पनीरचा रंग निळा तर भेसळ असल्याचं सिद्ध होईल.
advertisement

तुरीची डाळ

पनीरची भेसळ ओळखण्यासाठी तुरीच्या डाळीचा वापर करता येतो. यासाठी गरम पाण्यात पनीर उकळून घ्या. थंड झाल्यानंतर त्यात तुरीची डाळ टाका. जर पनीरचा रंग बदलून तो लाल झाला तर समजून जा की तुम्ही आणलेलं पनीर भेसळयुक्त आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Adulterated Panner: पनीर खाण्यापूर्वी घ्या ‘ही’ काळजी; तुमच्या पनीरमध्ये भेसळ तर नाही ? शुद्ध पनीर ओळखायचं कसं ?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement