Skin Peeling : हातापायांचे कातडे निघत आहेत? पाहा कारणं आणि त्यावर सोपे घरगुती उपाय!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
काहीवेळा आपल्या हातापायांचे कातडे निघू लागतात. हे नेमके कशामुळे होते हे बऱ्याचदा आपल्याला काळात नाही. हा त्रास बहुतांश वेळा पावसाळ्यात जास्त होतो. मात्र काही लोकांना हा त्रास उन्हाळ्यातही होतो.
मुंबई : वातावरणात बदल झाल्यनानंतर आपल्या आरोग्यावर आणि शरीरावरही त्याचा परिणाम दिसतो. काहीवेळा आपल्या हातापायांचे कातडे निघू लागतात. हे नेमके कशामुळे होते हे बऱ्याचदा आपल्याला काळात नाही. हा त्रास बहुतांश वेळा पावसाळ्यात जास्त होतो. मात्र काही लोकांना हा त्रास उन्हाळ्यातही होतो. याला स्किन पीलिंग म्हणतात, ज्यामध्ये त्वचेचा वरचा थर निघू लागतो.
अनेक कारणांमुळे त्वचेचा थर निघू लागतो. Myoclinic.org मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, त्वचा सतत पर्यावरणीय घटकांच्या संपर्कात असते. ऊन, वारा, उष्णता, कोरडेपणा आणि जास्त आर्द्रता यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. कधीकधी यामागे इतरही काही कारणं असू शकतात. आज आम्ही तुम्हाला यांची कारणं आणि त्यावर काय उपाय करावे याबद्दल माहिती देत आहोत.
advertisement
कातडी निघण्याची कारणं..
- आनुवंशिक रोग, ज्यात एक दुर्मिळ त्वचा विकार आहे, ज्यामध्ये ऍक्रल पीलिंग स्किन सिंड्रोम म्हणतात. यामुळे त्वचेचा वरचा थर म्हणजेच कातडीचा थर निघून जातो.
- रासायनिक साबण, क्रीम इत्यादींचा अतिवापर.
- ऍलर्जीक प्रतिक्रिया
- संक्रमण, बुरशीजन्य संसर्ग
- कर्करोग आणि त्याचे उपचार
- कोरडी त्वचा
- औषधोपचार साइड इफेक्ट्स
advertisement
- कॉन्टॅक्ट डर्मटायटिस
- ऍथलीट्स फूट
- सोरायसिस
- सनबर्न
- पोषक तत्वांची कमतरता
त्वचा सोलली जात असेल तर करा हे उपाय..
1. जर तुमच्या हात आणि पायांची त्वचा सोलून निघत असेल तर तुमची त्वचा खूप कोरडी आहे का याकडे लक्ष द्या. कोरड्या त्वचेमुळे जर त्वचा वारंवार सोलत असेल तर 10 मिनिटे कोमट पाण्यात हात बुडवून ठेवा. यामुळे तुमचे हात पाय मऊ होतील. कोरडेपणा निघून जाईल.
advertisement
2. या समस्येवर मात करण्यासाठी, आपल्या तळहातांना व्हिटॅमिन ई तेलाने मालिश करा. हे ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करेल. हात चमकतील आणि कोरडेपणा दूर होईल.
3. कोरडेपणा, सनबर्न, सोरायसिस इत्यादींवर तुम्ही कोरफडीचे जेल लावू शकता. याने मसाज करा आणि काही वेळ राहू द्या. कोमट पाण्याने धुवा आणि खोबरेल तेल लावा.
4. खोबरेल तेल लावूनही हातांचा कोरडेपणा दूर करू शकता. हे तेल लावून ५ मिनिटे मसाज करा.
advertisement
5. योग्य प्रमाणात पाणी पिट राहा. यामुळे त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळेल. हायड्रेटेड राहिल्यास तुम्हाला ही समस्या जाणवणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2024 9:50 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Peeling : हातापायांचे कातडे निघत आहेत? पाहा कारणं आणि त्यावर सोपे घरगुती उपाय!










