Skincare Routine : मुरुमे, ब्लॅकहेड्सला गुडबाय! 10 मिनिटांचे 4-2-4 स्किन केअर रूटीन बदलून टाकेल त्वचा

Last Updated:

Skincare Routine At Home : जगभरात त्यांच्या सौदर्याची आणि त्वचेचे आकर्षण आहे. त्यांची त्वचा केवळ स्वच्छ दिसत नाही तर फारसा मेकअप न करता देखील त्यांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसतो.

कोरियन स्किन केअर रूटीन टिप्स
कोरियन स्किन केअर रूटीन टिप्स
मुंबई : आजच्या काळात प्रत्येकालाच स्वच्छ, चमकदार आणि मऊ त्वचा हवी असते. प्रत्येकाला कोरियन मुलींच्या स्किनने आकर्षण आहे. जगभरात त्यांच्या सौदर्याची आणि त्वचेचे आकर्षण आहे. त्यांची त्वचा केवळ स्वच्छ दिसत नाही तर फारसा मेकअप न करता देखील त्यांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसतो. अनेकांना वाटते की इतक्या सुंदर त्वचेच्या मागे महागड्या ट्रीटमेंट्स, क्लिनिक भेटी किंवा परदेशी प्रॉडक्ट्स असतात, पण सत्य थोडे वेगळे आहे.
कोरियन महिला त्वचेच्या देखभालीसाठी काही सोपे आणि नियमित नियम पाळतात. यातील सर्वात लोकप्रिय नियम म्हणजे 4-2-4 स्किन केअर नियम आहे. तुम्हालाही घरी बसून, जास्त खर्च न करता तुमची त्वचा सुधारायची असेल तर ही पद्धत उपयुक्त ठरू शकते. हा नियम चेहऱ्याच्या खोलवर स्वच्छतेवर भर देतो. त्यामुळे दिवसभर चेहऱ्यावर साचलेली घाण, धूळ, घाम आणि सनस्क्रीन पूर्णपणे निघून जाते. स्वच्छ त्वचाच चांगल्या स्किन केअरची मूळ गरज असते. 4-2-4 नियम हीच मूळ गरज मजबूत करतो. हा नियम फॉलो केल्यास काही दिवसांतच त्वचा स्वच्छ, मऊ आणि पूर्वीपेक्षा अधिक चमकदार दिसू लागते.
advertisement
काय आहे 4-2-4 कोरियन स्किन केअर नियम?
4-2-4 स्किन केअर नियम हा एकूण 10 मिनिटांचा सोपा रूटीन आहे आणि तो तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करावा लागतो. ही पद्धत डबल क्लींजिंगवर आधारित आहे जी कोरियन स्किन केअरचा महत्त्वाचा भाग मानली जाते. यामध्ये आधी ऑइल क्लींजर, नंतर फेस वॉश आणि शेवटी पाण्याने चेहरा नीट धुतला जातो. या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश त्वचा फक्त वरून नाही तर आतून देखील स्वच्छ करणे हा असतो.
advertisement
पहिला टप्पा : 4 मिनिटे ऑइल क्लींजर
या टप्प्यात कोरड्या त्वचेवर क्लींजिंग ऑइल लावले जाते. ऑइल चेहऱ्यावर हलक्या हाताने 4 मिनिटे मसाज करा. नाक, कपाळ आणि हनुवटीसारख्या भागांवर लक्ष द्या कारण तिथे जास्त घाण आणि तेल साचते. ऑइल क्लींजर मेकअप, सनस्क्रीन आणि अतिरिक्त तेल वितळवून बाहेर काढण्यास मदत करतो. या दरम्यान त्वचा जास्त घासायची नाही, फक्त हलकी मसाज पुरेशी असते.
advertisement
दुसरा टप्पा : 2 मिनिटे फोम किंवा जेल क्लींजर
आता चेहऱ्यावर थोडे पाणी लावा आणि फोम किंवा जेल बेस्ड फेस वॉश वापरा. गोल-गोल फिरवत 2 मिनिटे मसाज करा. यामुळे ऑइल क्लींजरचे उरलेले अंश आणि बाकीची घाण साफ होते. हा टप्पा त्वचेला फ्रेश वाटण्यास मदत करतो आणि रोमछिद्रे स्वच्छ करतो.
तिसरा टप्पा : 4 मिनिटे पाण्याने धुणे
हा टप्पा अनेकदा लोक दुर्लक्ष करतात, पण तो खूप महत्त्वाचा असतो. आधी 2 मिनिटे कोमट पाण्याने चेहरा धुवा, जेणेकरून घाण पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर 2 मिनिटे थंड पाण्याने चेहरा धुवा. थंड पाणी त्वचा टाइट करण्यास मदत करते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ताजेपणा आणते.
advertisement
डबल क्लींजिंगचे फायदे
4-2-4 नियमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्वचा पूर्णपणे स्वच्छ होते. त्यामुळे मुरुमे, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या कमी होऊ लागते. स्वच्छ त्वचेवर लावलेले सीरम आणि मॉइश्चरायझर अधिक चांगल्या प्रकारे काम करतात. नियमितपणे हा रूटीन पाळल्यास त्वचा सॉफ्ट, स्मूद आणि हेल्दी दिसू लागते.
हा उपाय कोणासाठी फायदेशीर?
हा नियम ऑयली, ड्राय आणि कॉम्बिनेशन स्किन असणाऱ्यांसाठी योग्य ठरतो. ज्यांना रोज बाहेर जावे लागते, सूर्यप्रकाश आणि प्रदूषणाचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी ही स्किन केअर रूटीन खूप प्रभावी ठरू शकते.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skincare Routine : मुरुमे, ब्लॅकहेड्सला गुडबाय! 10 मिनिटांचे 4-2-4 स्किन केअर रूटीन बदलून टाकेल त्वचा
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement