Best Sleeping Hack : रात्र-रात्र झोप लागत नाही? तज्ज्ञांनी सांगितला सोपा हॅक, 5 मिनिटांत लागेल शांत झोप!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Best Sleep hack for insomnia and sleeplessness : झोपेसाठी डायरी लिहिणे किंवा मेडिटेशन करणे अशा क्लिष्ट उपायांपेक्षा, प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट अँड्र्यू ह्युबरमॅन (Andrew Huberman) यांनी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे.
मुंबई : आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक लोकांना शांत आणि गाढ झोप लागत नाही, ज्यामुळे निद्रानाशाची समस्या वाढली आहे. झोपेसाठी डायरी लिहिणे किंवा मेडिटेशन करणे अशा क्लिष्ट उपायांपेक्षा, प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट अँड्र्यू ह्युबरमॅन (Andrew Huberman) यांनी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. हा उपाय म्हणजे फक्त डोळ्यांच्या साध्या हालचालीतून आपल्या मज्जासंस्थेला शांत करून त्वरित झोप लागण्यास मदत करणे.
हा उपाय इतका प्रभावी का आहे?
जेव्हा आपण डोळे मिटून हळू हळू वेगवेगळ्या दिशांना फिरवतो, तेव्हा मेंदूला एक शांततेचा आणि सुरक्षिततेचा संकेत मिळतो. यामुळे आपली मज्जासंस्था तणावग्रस्त अवस्थेतून बाहेर पडून शांत आणि निवांत अवस्थेत जाते. परिणामी आपल्याला त्वरित आणि सहजपणे झोप लागण्यास मदत होते. यासाठी कोणतीही तयारी किंवा मोठी दिनचर्या आवश्यक नाही.
advertisement
शांत झोपेसाठी रात्री करून पाहा हा उपाय..
आपल्या अंथरुणावर आरामात पाठीवर झोपा आणि डोळे मिटून घ्या. आता डोळे मिटलेले असताना, डोळ्यांच्या बुबुळांची हालचाल प्रथम उजवीकडे नंतर डावीकडे करा, त्यानंतर वर आणि खाली हळू हळू करा. यानंतर डोळे मिटलेले असतानाच बुबुळे हळू हळू घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि नंतर विरुद्ध दिशेने वर्तुळाकार फिरवा. जोपर्यंत तुम्हाला झोप लागत नाही, तोपर्यंत या हालचाली हळूवारपणे आणि शांतपणे करत राहा. सुरुवातीला झोप लागण्यासाठी 10 ते 15 फेऱ्या लागू शकतात.
advertisement
शांत झोपेसाठी इतर काही महत्त्वाच्या टिप्स..
- मनाला आराम देण्यापूर्वी शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा.
- झोपण्यापूर्वी 30 ते 45 मिनिटे मोबाईल किंवा इतर स्क्रीन पाहणे टाळा.
- तुमची खोली थंड आणि पूर्णपणे अंधारी ठेवा.
- तणावपूर्ण विचारांची उजळणी करणे टाळा. स्वतःला आठवण करून द्या की, "मी याबद्दल उद्या विचार करू शकतो."
advertisement
- झोपेशी संघर्ष करू नका, आपल्या शरीराला हळू हळू रिलॅक्स होऊ द्या.
advertisement
तज्ञांच्यामते, चांगली झोप घेणे हे आत्म-प्रेमाचे एक रूप आहे. आपल्या शरीराला आणि मनाला विश्रांती मिळणे आवश्यक आहे. हा सोपा आय-मूव्हमेंट हॅक वापरून तुम्ही तुमच्या झोपेच्या गुणवत्तेत नक्कीच सुधारणा करू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2025 4:11 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Best Sleeping Hack : रात्र-रात्र झोप लागत नाही? तज्ज्ञांनी सांगितला सोपा हॅक, 5 मिनिटांत लागेल शांत झोप!


