Tiktok Banned in USA: ‘या’ कारणामुळे अमेरिकेत टिकटॉकवर बंदी, सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब

Last Updated:

TikTok shuts down in the United States: चीनी सोशल मीडिया ॲप्स आणि प्लॅटफॉर्म्सवर अमेरिकेत निर्बंध लादण्यात आले होते. राष्ट्रध्यक्षांच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायायलाने कायम ठेवत टिकटॉकवर (TikTok) बंदी कायम ठेवलीये आहे.

प्रतिकात्मक फोटो : अमेरिकेत टिकटॉकवर बंदी, ‘टिकटॉक’ला ट्रम्प सरकारकडून आशा
प्रतिकात्मक फोटो : अमेरिकेत टिकटॉकवर बंदी, ‘टिकटॉक’ला ट्रम्प सरकारकडून आशा
मुंबई : अखेर अमेरिकेतही  टिकटॉकची टिकटिक थांबली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी रात्री टिकटॉकने अमेरिकेत आपली सेवा थांबवली असून अमेरिकेन लोकांना वापरता येणाऱ्या विविध ॲपस्टोर्समधून हे ॲप अन-इन्स्टॉल करण्यात आलंय. एप्रिलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक नवा कायदा पारित केला होता. ज्यानुसार चीनी सोशल मीडिया ॲप्स आणि प्लॅटफॉर्म्सवर अमेरिकेत निर्बंध लादण्यात आले होते. राष्ट्रध्यक्षांच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायायलाने कायम ठेवत टिकटॉकवर (TikTok) बंदी कायम ठेवलीये आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची कल्पना कदाचित टिकटॉकच्या अधिकाऱ्यांना पूर्वीपासून असावी. म्हणूनच निर्णयाची अमंलबजावणी होण्याच्या 2 तास आधीपासूनच टिकटॉकने आपली सेवा स्वत:हून बंद केली. 17 कोटींहून अधिक अमेरिकन लोकांना या टिकटॉकबंदीचा फटका बसलाय. ज्या लोकांच्या फोनवर ॲप होते त्यांना एक मेसेज आला की, ‘अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला टिकटॉक वापरता येणार नाही. आम्हाला माफ करा.’
advertisement

बायडेन सरकारवर अप्रत्यक्ष टिका ?

बायडेन सरकारने अमेरिकेत टिकटॉकवर बंदी लादण्याचा निर्णय घेतल्यामुळे टिकटॉकने अप्रत्यक्षपणे बायडेन सरकारवर टीका केल्याचं दिसून येतंय. अमेरिकन नागरिकांना पाठवलेल्या संदेशात टिकटॉकने असं म्हटलं आहे की, ‘आमच्यावर घातलेल्या बंदीमुळे आम्ही तुम्हाला तूर्तास सेवा जरी देऊ शकत जरी नसलो तरीही डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर टिकटॉकला दिलासा मिळेल, भविष्यात ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते टिकटॉकवरची बंदी हटवतील असा विश्वास आम्हाला आहे. तोपर्यंत आमच्याशी कृपया जोडलेले राहा.’
advertisement

कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी त्वरीत बंदी

जो बायडन प्रशासनाने टिकटॉकवर बंदी घातली असती तरीही नियमानुसार टिकटॉकला 90 दिवसांचा वेळ मिळू शकतो अशी शक्यता निर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केलीये. सध्या टिकटॉकला कोणतीहा नवीन कायदेशीर पेच नकोय म्हणून त्यांनीच ॲप आणि कॅपकट सारख्या इतर संबंधित सेवा देखील Google Play आणि Apple App Store वरून काढून टाकल्या आहेत.
advertisement

TikTok चा धोका का?

CNN च्या रिपोर्टनुसार, अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अनेक व्यवसाय पूर्णपणे टिकटॉकवर अवलंबून आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांची सगळी माहिती ही टिकटॉककडे उपलब्ध आहे. त्यातच टिकटॉकचे चीनचे असलेले संबंध यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका होऊन शकतो. म्हणूनच फक्त टिकटॉकच नाही तर इतर चीनी कंपन्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील बंदी घातली जाणार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tiktok Banned in USA: ‘या’ कारणामुळे अमेरिकेत टिकटॉकवर बंदी, सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement