पर्यटकांनो, सावधान! वाल्मीक पठाराच्या रस्त्यात उभा आहे मृत्यू; 'अशी' घ्या काळजी, नाहीतर...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
साताऱ्याच्या वाल्मीक पठारावरील घनदाट जंगल परिसरात सध्या बिबट्या आणि महाकाय गव्यांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या...
सातारा : वाल्मीक पठारावरील गावांमध्ये प्रवास करताना आता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. घनदाट जंगल आणि उंच डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या नैसर्गिक सौंदर्याच्या परिसरात सध्या वन्यप्राण्यांचा, विशेषतः बिबट्यांचा आणि गव्यांचा, मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे या भागात दुचाकीवरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. स्थानिक शेतकरी आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.
शेतकऱ्यांची वाढलीय चिंता
वाल्मीक पठारावरील अनेक गावांचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये करण्यात आला आहे. यामुळे नैसर्गिकरित्याच येथे वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यासारखे प्राणी भक्ष्याच्या शोधात थेट मानवी वस्तीत घुसल्याने आधीच लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच, आता महाकाय गवे बिनधास्तपणे रस्त्यांवर आणि शेतांमध्ये फिरताना दिसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
advertisement
अचानक रस्त्यावर येताहेत गवे
'वाल्मीक पठारावरील गावात प्रवास करत असाल, तर वन्यप्राण्यांपासून सावधान' असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. या वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. हे प्राणी केवळ पिकांचेच नुकसान करत नाहीत, तर पाळीव जनावरांच्या कळपात शिरून त्यांनाही धोका निर्माण करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे रानात चरायला सोडणेही अवघड झाले आहे. अनेकवेळा गवे अचानक रस्त्यावर आल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
advertisement
स्थानिकांना हवीय प्रशासनाची मदत
या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ वनविभागाकडे करत आहेत. वन्यप्राण्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात करणे, आवश्यक ठिकाणी कुंपण घालणे आणि लोकांना सतर्क राहण्यासाठी योग्य त्या सूचना देणे यांसारख्या उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा, भविष्यात जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
हे ही वाचा : हाण की बडीव! 2 तृतीयपंथींच्या गटात तुफान हाणामारी; पोलिसांच्याही अंगावर गेले धावून आणि मग...
हे ही वाचा : Crime: दारूवरून पेटला वाद, रेल्वेरुळावर आपटलं डोकं, एका मिनिटांत 'त्या' भंगारवाल्याचा खेळ खल्लास!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 10:04 AM IST
मराठी बातम्या/Travel/
पर्यटकांनो, सावधान! वाल्मीक पठाराच्या रस्त्यात उभा आहे मृत्यू; 'अशी' घ्या काळजी, नाहीतर...