संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चिमुकल्यांची ‘वनराणी’ पुन्हा ट्रॅकवर, कशी आहे नवी टॉय ट्रेन?

Last Updated:

Sanjay Gandhi National Park: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चिमुकल्यांची लाडकी वनराणी पुन्हा धावणार आहे. नव्या रुपातील याच ट्रॉय ट्रेनबाबत जाणून घेऊ.

+
संजय

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चिमुकल्यांची ‘वनराणी’ पुन्हा ट्रॅकवर, कशी आहे नवी टॉय ट्रेन?

मुंबई : ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ हे ठिकाण केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं आवडतं ठिकाण आहे. सगळ्यांनाच या ठिकाणाला भेट देण्याची उत्सुकता असते. त्यामुळे तुम्हीही या पावसाळ्यात एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बोरिवलीतील नॅशनल पार्क बेस्ट पर्याय असेल. आता आणखी एक आनंदाची बाब म्हणजे येथील लहानग्यांची आवडती आणि अनेकांची बालपणीची आठवण ‘वनराणी’ टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार आहे. बंद पडलेल्या या ट्रेनला आता एकदम नवीन रूप देण्यात आलं असून ती अधिक सुंदर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनली आहे.
नव्या ‘वनराणी’ मध्ये काय खास?
नव्या ‘वन राणी’ टॉय ट्रेनमध्ये अनेक खास गोष्टी आहेत. ही ट्रेन आता पूर्णपणे बॅटरीवर चालते, त्यामुळे तिच्यात धूर नाही, आवाज नाही. निसर्गासाठीही ती अधिक अनुकूल आहे. डब्यांना मोठ्या काचांच्या खिडक्या आणि पारदर्शक छप्पर दिलं गेलं आहे, त्यामुळे प्रवासादरम्यान झाडं, प्राणी आणि आकाश यांचं सौंदर्य सहजपणे पाहता येणार आहे. ट्रेनच्या आत आरामशीर, अगदी मेट्रोसारखी आसनव्यवस्था आहे. त्यामुळे लांबच्या प्रवासातही आराम मिळेल. डब्यांवर जंगलातील प्राणी आणि झाडांची रंगीत चित्रं देखील काढलेली आहेत, त्यामुळे ही सफर विशेषतः मुलांसाठी मजेदार आणि शैक्षणिक ठरेल.
advertisement
या टॉय ट्रेनच्या नव्या रूपासाठी मोठं काम करण्यात आलं आहे. संपूर्ण 2.3 किमी लांबीचा ट्रॅक दुरुस्त करण्यात आला असून ट्रॅकवर असलेले 15 पूल पुन्हा नव्याने बांधण्यात आले आहेत. याशिवाय कृष्णागिरी आणि तीनमूर्ती हे दोन्ही स्टेशन आधुनिक सुविधांसह सजवले गेली आहेत. ट्रेनचं नवीन युनिट अहमदाबादहून आणण्यात आलं असून त्याच्या चाचणी फेऱ्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. हे सगळं मिळून आता 'वनराणी' पुन्हा एकदा नव्या जोमात सुरू होण्यासाठी सज्ज झाली आहे.
advertisement
नॅशनल पार्कमधील तिकीट दर 
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रवेश करण्यासाठी प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी सध्या 103 रुयपे इतकं शुल्क आकारलं जात आहे. लहान मुलांसाठी (5 ते 12 वयोगटातील) तिकीट दर कमी असून साधारणपणे 55 रुपये असणार आहे. तर 5 वर्षांखालील मुलांसाठी प्रवेश मोफत आहे. ‘वनराणी’ टॉय ट्रेनसाठी स्वतंत्र तिकीट लागतं. नव्या व्हिस्टाडोम डब्यांसह ही ट्रेन अधिक आकर्षक आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे तिचं तिकीट पूर्वीपेक्षा थोडं अधिक असण्याची शक्यता आहे. याआधीच्या जुन्या ट्रेनसाठी तिकीट दर साधारण 50 ते 100 दरम्यान होते. नवीन ट्रेनसाठी अचूक दर अजून जाहीर करण्यात आलेले नाहीत.
मराठी बातम्या/Travel/
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चिमुकल्यांची ‘वनराणी’ पुन्हा ट्रॅकवर, कशी आहे नवी टॉय ट्रेन?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement