Karnataka`s Deadly Idly: सावधान ! डेडली ठरू शकते ‘ही’ ईडली, देईल कॅन्सरला निमंत्रण, व्हा सावध
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Karnataka`s Deadly Idly in Marathi: कर्नाटकातल्या काही हॉटेल्स आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या दुकानदारांनी इडली शिजवण्यासाठी पॉलिथिन शीटचा वापर करायला सुरूवात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटक अन्न सुरक्षा विभागाने 52 हॉटेल्सची तपासणी केल्यानंतर, हा धक्कादायक प्रकार उघड झालाय.
मुंबई : इडली, डोसा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. दक्षिण भारतातले हे 2 पदार्थ फक्त भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही तर संपूर्ण जगभरात कसे पसरले हे सांगणं तसं कठीण. जसं आपल्या महाराष्ट्रात जेवणात वरण भात असतं तसं दक्षिण भारतातल्या नागरिकांच्या नाश्त्यात, जेवणात इडली डोसा हे आढळून येतं. इडली बनवण्यासाठी ती वाफेवर शिजवावी लागते. आपल्यापैकी अनेकांच्या घरी इडलीचं भाडं असतं. मात्र हॉटेल किंवा मोठ्या रेस्ट्रॉरंटमध्ये इडली शिजवण्यासाठी कापडाचा वापर केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटकात एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. हॉटेलचालकांच्या मूर्खपणामुळे इडली खाणं हे अनेकांच्या जीवावर बेतू शकतंय. जाणून घेऊयात कर्नाटकातल्या ‘डेडली इडली’ बद्दल
‘डेडली इडली’ नेमका प्रकार काय ?
कर्नाटकातल्या काही हॉटेल्स आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या दुकानदारांनी इडली शिजवण्यासाठी पॉलिथिन शीटचा वापर करायला सुरूवात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटक अन्न सुरक्षा विभागाने 52 हॉटेल्सची तपासणी केल्यानंतर, हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. सध्या तिथली सर्व हॉटेल्स आणि रस्त्यालगतच्या इडली बनवण्याच्या दुकानांमध्ये प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
advertisement

पॉलीथीन शीट किती धोक्याची?
खरंतर, इडलीचे पीठ बनवल्यानंतर, प्रथम इडलीच्या साच्यावर एक कापड ठेवले जाते. त्यावर इडलीचे पीठ ओतले जाते आणि नंतर ते वाफवून शिजवले जाते. पण कर्नाटकात सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवसायात कापडाऐवजी धोकादायक प्लास्टिकच्या शीट्स वापरल्या जात होत्या. इडली वाफवण्यासाठी प्लास्टिकच्या शीटने झाकल्या होत्या. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की, प्लास्टिकमध्ये धोकादायक रसायनं असतात. प्लास्टिक हे कार्सिनोजेनिकमानलं जातं. प्लास्टिकच्या कपातून घोटभर चहा पिणं हे आरोग्यासाठी धोकादायक मानलं गेलंय. त्यामुळे विचार करा की, इडली वाफेवर शिजवण्यासाठी वापरल्या गेलेल्या प्लास्टिक शीट्समधली किती धोकादायक रसायनं त्या इडलीमध्ये मिसळली असतील ?
advertisement
कार्सिनोजेनिक म्हणजे काय?
कार्सिनोजेनिक म्हणजे कर्करोगाला आमंत्रण देणारा किंवा कॅन्सरच्या ग्रंथीच्या वाढींसाठी मदत करणारा पदार्थ. कार्सिनोजेनिक गोष्टी या खूप धोकादायक असतात. त्यामुळे अशा पदार्थांचा, गोष्टींचा वापर जर अन्नात शिजवताना होत असेल, कॅन्सर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. सूर्याची अतिनील किरणे, सिगारेटचा धूर, वाहनांचा धूर, अॅस्बेस्टॉससारखी रसायनं, विषारी धातू आणि वायू इत्यादी अनेक गोष्टींमध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे अशा पदार्थांच्या पदार्थांच्या सतत संपर्कात राहिल्याने कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. यामुळे पेशींच्या अनुवांशिक रचनेत होतो.
advertisement
कोणत्या कर्करोगांचा धोका ?
view commentsकार्सिनोजेनिक रसायनांच्या संपर्कात आल्याने महिलांना स्तनाचा तर महिला आणि पुरूषांना, पोटाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, कोलन कर्करोग, होण्याची भीती असते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 28, 2025 6:09 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Karnataka`s Deadly Idly: सावधान ! डेडली ठरू शकते ‘ही’ ईडली, देईल कॅन्सरला निमंत्रण, व्हा सावध


