Pet Lovers तुमच्या कुत्र्याचं लसीकरण झालंय ना? 7 जीवघेण्या आजारांपासून त्याला वाचवा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपला पाळीव कुत्रा सुदृढ राहावा यासाठी त्याला भटक्या कुत्र्यांपासून दूर ठेवा. कारण सर्वच कुत्र्यांचं लसीकरण झालेलं नसतं.
सिमरनजीत सिंह, प्रतिनिधी
शाहजहापूर : जर तुम्ही डॉग लव्हर्स असाल तर सध्याच्या बदलत्या हवामानात आपल्या कुत्र्यांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण सध्या कुत्र्यांमध्ये प्रचंड रोगराई पसरतेय. या जीवघेण्या आजारांपासून आपल्या कुत्र्यांचं रक्षण केवळ लसीकरणामुळे होऊ शकतं. तरच आपला पाळीव कुत्रा सुदृढ राहू शकतो.
डॉ. शिवकुमार यादव सांगतात, 7 इन 1 लसीमुळे कॅनाइन पार्वो व्हायरस, कॅनाइन डिस्टेंपर, पार्वो व्हायरस टाइप 1, पार्वो व्हायरस टाइप 2, हेपेटाइटिस आणि लॅप्रोस्पायरस या आजारांपासून कुत्र्यांचं रक्षण होऊ शकतं. अगदी लहान वयातच त्यांना हे आजार होतात. उलटी, मळमळ ही त्यांची सुरूवातीची लक्षणं असतात. त्यामुळे आधी साधे वाटणारे हे आजार नंतर एवढे गंभीर होतात की, त्यामुळे कुत्र्यांच्या हृदयाला आणि नसांना सूज येते. परिणामी यात त्यांचा जीवही जाऊ शकतो.
advertisement
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 इन 1 लसीचा पहिला डोस आपला कुत्रा 6 आठवड्यांचा असताना द्यायला हवा. त्यानंतर 3 आठवड्यांनी बूस्टर डोस द्यायचा. मग दरवर्षी एकदा आपल्या कुत्र्याला ही लस दिली गेली पाहिजे.
advertisement
लक्षात घ्या, आपला पाळीव कुत्रा सुदृढ राहावा यासाठी त्याला भटक्या कुत्र्यांपासून दूर ठेवा. कारण सर्वच कुत्र्यांचं लसीकरण झालेलं नसतं. त्यामुळे त्यांना असलेल्या आजाराचा संसर्ग आपल्या कुत्र्याला होऊ शकतो. म्हणूनच काळजी घ्यावी.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
Location :
Shahjahanpur,Uttar Pradesh
First Published :
February 13, 2024 2:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pet Lovers तुमच्या कुत्र्याचं लसीकरण झालंय ना? 7 जीवघेण्या आजारांपासून त्याला वाचवा!