ॲपल सायडर व्हिनेगर कधी आणि कसं घ्यावं? जाणून घ्या योग्य पद्धत्त, तरच व्हाल स्लिम अन् फिट!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) नैसर्गिक वजन कमी करणारे टॉनिक मानले जाते. त्यातील घटक पचन सुधारतात, चरबी कमी करतात, भूक कमी करतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात. उपाशीपोटी...
आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत आहेत. त्यातच ॲपल सायडर व्हिनेगर म्हणजे सफरचंद सिरका वापरण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. ‘ॲपल व्हिनेगर’ वजन कमी करण्यासाठी हे एक नैसर्गिक औषध म्हणून काम करतं. काही संशोधनांमध्ये तर असंही सांगितलं आहे की, वजन कमी करण्यासाठी हे खूपच प्रभावी आहे. ॲपल सायडर व्हिनेगरमुळे वजन तर कमी होतंच, पण शरीरातील चरबी घटण्यासही मदत होते. विशेषतः पोटावरची हट्टी चरबी कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
ॲपल सायडर व्हिनेगरचे फायदे तर बहुतेक लोकांना माहीत आहेत, पण ते कसं वापरायचं याची योग्य पद्धत अनेकांना ठाऊक नसते. चला तर मग आज आपण जाणून घेऊया... वजन कमी करण्यासाठी ॲपल व्हिनेगर कशा प्रकारे वापरायला हवं.
हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार
1) संशोधनात असं दिसून आलं आहे की, ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर हजारो वर्षांपासून आरोग्य टॉनिक म्हणून केला जातोय. यात अनेक नैसर्गिक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. काही अभ्यासांमध्ये असंही आढळलं आहे की ॲपल सायडर व्हिनेगर प्यायल्याने लोकांची भूक कमी होते, ज्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.
advertisement
2) ॲपल सायडर व्हिनेगर अनेक पदार्थांमध्ये मिसळून खाता येत असलं तरी, ते घेण्यापूर्वी एका ग्लास पाण्यात 15 ते 30 मिलीलीटर मिक्स करून प्यावं. जास्त फायद्यासाठी दिवसातून दोन वेळा, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी 15-15 मिलीलीटर पाण्यात मिसळून पिऊ शकता. यामुळे वजन कमी होऊ शकतं.
3) आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर ॲपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून रिकाम्या पोटी घेतलं तर वजन कमी करण्यासोबतच त्याचे इतरही अनेक फायदे मिळतात. सकाळी रिकाम्या पोटी ॲपल सायडर व्हिनेगर प्यायल्याने शरीराची मेटाबॉलिझम क्रिया सुधारते. या व्हिनेगरमध्ये असलेले एन्झाईम पचनक्रिया सुधारतात आणि गॅस, ॲसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम देतात.
advertisement
4) रिकाम्या पोटी ॲपल सायडर व्हिनेगर प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी खूपच फायदेशीर आहे. इतकंच नव्हे तर ते शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासही मदत करतं.
5) काही संशोधनात असंही आढळलं आहे की, नियमितपणे ॲपल सायडर व्हिनेगर प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची (LDL) पातळी कमी होऊ शकते. ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. यासोबतच ॲपल सायडर व्हिनेगर त्वचेला तजेलदार बनवतं आणि कोंड्याची समस्या कमी करतं. परंतु, आरोग्य तज्ज्ञ असा इशाराही देतात की, लोकांनी ॲपल सायडर व्हिनेगर जास्त प्रमाणात आणि दीर्घकाळ घेऊ नये. असं केल्याने शरीरावर त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे व्हिनेगर वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
advertisement
हे ही वाचा : नारळपाण्याने घेतला जीव! Coconut water प्यायल्यानंतर काही तासांतच मृत्यू, तुम्हीही पिताय तर सांभाळून
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 17, 2025 12:43 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ॲपल सायडर व्हिनेगर कधी आणि कसं घ्यावं? जाणून घ्या योग्य पद्धत्त, तरच व्हाल स्लिम अन् फिट!










