Changeri Health Benefits: गंभीर आजारावर गुणकारी ठरेल पालक सारखी दिसणारी ही भाजी, नाव आणि फायदे ऐकून व्हाल चकीत
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health Benefits of Changeri in Marathi : आंबट चुकाच्या भाजीमध्ये प्रोटीन्स, फॅट, कार्बोहाय़ड्रेट्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, मँगनीज, कॉपर, आयर्न, पोटॅशियम, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी6, इतकी पोषक तत्त्वं आढळून येतात. त्यामुळे विविध आजारांवर ही भाजी खाणं फायद्याचं ठरतं.
मुंबई: हिवाळ्यात विविध पालेभाज्या खाणं फायद्याचं मानलं जातं. अनेक भाज्यांपैकी पालकाची भाजी ही प्रचंड आरोग्यदायी मानली जाते. मात्र बाजारात सध्या हुबेहुब पालकासारखी दिसणारी पालेभाजी उपलब्ध आहे. या भाजीचं गावरान नाव आहे आंबट चुका. हिंदीमध्ये चंगेरी तर इंग्रजीमध्ये स्पिनच डॉक, सॉरेल लिव्हज या नावाने ही भाजी ओळखली जाते. जाणून घेऊयात पालकभाजी सारखी दिसणारी ही भाजी पोषकतत्त्वांबाबतीत पालकापेक्षा उजवी ठरते की नाही ते.
आंबट चुका / सॉरेल लिव्हज् मध्ये असणारी पोषकतत्त्वे
आंबट चुका भाजी ही नावाप्रमाणे चवीला हलकीशी आंबट असते. त्यामुळे या भाजीत अपेक्षेप्रमाणे व्हिटॅमिन सी आढळून येतं. याशिवाय या भाजीमध्ये प्रोटीन्स, फॅट, कार्बोहाय़ड्रेट्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, मँगनीज, कॉपर, आयर्न, पोटॅशियम, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी6, इतकी पोषक तत्त्वं आढळून येतात. यात असलेल्या फायबर्समुळे वातदोषांसह ज्यांना पोटाचे किंवा पचनाचा त्रास आहेत अशा व्यक्तींनी आंबट चुकाची भाजी खाणं फायद्याचं ठरतं. याशिवाय भूक न लागणे, जळजळ, अंगदुखी, मूत्रमार्गाचा दाह, अशा विविध आजारांवर ही भाजी आरोग्यदायी ठरते.
advertisement
जाणून घेऊयात आंबट चुका, चंगेरी किंवा सॉरेल लिव्हज् खाण्याचे फायदे
वजन कमी करण्यास फायदेशीर:
चंगेरीच्या भाजीत मुबलक प्रमाणात फायबर असते. त्यामुळे अन्न पचायला मदत होते. याशिवाय फायबर्समुळे पोट भरलेलं राहत असल्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ही भाजी खाणं फायद्याचं ठरतं. याशिवाय यात असलेल्या फॉस्फरसमुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे पोट साफ करण्यासोबतच अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यात आंबटचुकाची भाजी फायद्याची ठरते.
advertisement
डोळ्यांसाठी फायदेशीर:
या भाजीत व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात आढळून येतं. दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींनी ही भाजी खाल्ल्यामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं.
कॅन्सरवर गुणकारी:
विविध संशोधनानुसार, चंगेरीच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनॉइड्स, नॅप्थालीनसारखे अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे शरीरातल्या पेशींवरचा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होऊन मुक्त रॅडिकल्सपासून शरीराचं रक्षण होतं. पबमेड सेंट्रल जर्नलमध्ये प्रकाशीत लेखानुसार, ही भाजी खाल्ल्याने स्तन, गर्भाशय आणि त्वचेच्या कर्करोगांना अटकाव करता येतो.
advertisement
हृदयासाठी फायद्याचं:
चंगेरीच्या पानांमध्ये विविध पोषक तत्त्वांसोबत पोटॅशियम आणि झिंक देखील असतं. हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं. चंगेरीच्या भाजीमुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाणही नियंत्रिकत राहतं त्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये कोणताही अडथळा न आल्याने रक्तदाब नियंत्रित राहून हृदयाचं आरोग्य सुधारतं.
advertisement
या भाजीत असलेल्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे सांधेदुखी, अंगदुखीपासून आराम मिळू शकतो. याशिवाय चंगेरीची किंवा आंबटचुकाची भाजी खाल्ल्याने किडनीचं आरोग्य सुधारून विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकायला मदत होते. त्यामुळे ही भाजी खाल्ल्याने शरीर आतून स्वच्छ व्हायला मदत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 09, 2025 8:23 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Changeri Health Benefits: गंभीर आजारावर गुणकारी ठरेल पालक सारखी दिसणारी ही भाजी, नाव आणि फायदे ऐकून व्हाल चकीत