Stickers On Fruits: फळांवर असलेल्या स्टिकर्सचा अर्थ काय? ‘हे’ स्टिकर असेल तर व्हा सावध

Last Updated:

Meaning & importance of fruit stickers in Marathi: फळांवर लावलेल्या स्टिकर्सचा, आणि फळांच्या गुणवत्तेशी खरंच संबंध आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो. Best Quality Fruits असं स्टिकर्स असलेली फळं खरच चांगल्या दर्जाची असतात का? त्या स्टिकर्सचा आणि एक्सपायरी डेटशी काही संबंध असतो का?

News18
News18
मुंबई : आजकाल बाजारात विकल्या जाणाऱ्या अनेक फळांवर स्टिकर्स लावण्याचा ट्रेंड वाढला आहे. पूर्वी सफरचंदांवर स्टिकर्स लावले जात होते, पण आता संत्री आणि किवी आणि इतर अनेक फळांवरही स्टिकर्स लावले जात आहेत. फळ विक्रेत्यांचा दावा असतो की, स्टिकर असलेली फळं चांगल्या दर्जाची असतात आणि स्टिकर नसलेल्या फळांपेक्षा त्यांची किंमत जास्त असते. लोकांनाही ते खरं वाटतं. स्टिकर असलेली फळे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात असा विचार करून ते महागड्या किमतील फळं विकत घेतात. मात्र फळांवर लावलेल्या स्टिकर्सचा, आणि फळांच्या गुणवत्तेशी खरंच संबंध आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो.  Best Quality Fruits असं स्टिकर्स असलेली फळं खरच चांगल्या दर्जाची असतात का त्या स्टिकर्सचा आणि एक्सपायरी डेटशी काही संबंध असतो का याचं उत्तर थेट जाणून घेऊयात पूनम डाएट अँड वेलनेस क्लिनिकच्या आहारतज्ज्ञ पूनम दुनेजा यांच्या कडून.

स्टिकर्स आणि आरोग्याचा संबंध ?

दुनेजा यांनी न्यूज18 ला सांगितलं की, फळांवर स्टिकर लावून विक्री करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढतो आहे. मात्र हे स्टिकर्स 2 प्रकारचे आहेत. काही स्टिकर्स हे फक्त बेस्ट क्वॉलिटी असं लिहिलेले असतात. परंतु या स्टिकर्सचा आरोग्याशी काहीही संबंध नाही. विदेशातून आयात केल्या गेलेल्या फळांवर फळांची किंमत आणि त्याची एक्सपायरी डेट आणि पीएलयू कोड असतो. हा कोड फळाची गुणवत्ता आणि फळ कसं वाढवले ​​गेलं आहे ते दर्शवितो.
advertisement

Meaning & importance of fruit stickers in Marathi: फळांवर असलेल्या स्टिकर्सचा अर्थ काय? ‘हे’ स्टिकर असेल तर व्हा सावध

स्टिकर्सवरच्या कोडचा चा अर्थ काय?

4 ने सुरू होणारा कोड : आहारतज्ज्ञांनी सांगितले की काही सफरचंद किंवा इतर फळांवर चार-अंकी क्रमांक लिहिलेला असतो, जसे की 4026, 4978. याचा अर्थ असा की ही फळे कीटकनाशकं आणि रसायने वापरून पिकवली गेली आहेत. यामध्ये कीटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर केला जातो.
advertisement
8 ने  सुरू होणारा कोड: काही फळांच्या स्टिकर्सवर 5 ने सुरू होणारा ५-अंकी क्रमांक असतो. उदा. 84131, 86532 याचा अर्थ असा की, या फळांमध्ये कीटकनाशकांचा वापर कमी असू शकतो.
9 ने सुरू होणारा  कोड : काही फळांवर 9 ने सुरू होणारा पाच-अंकी कोड असतो, जसं की 93435 याचा अर्थ असा की ही फळं सेंद्रिय पद्धतीने पिकवली गेली आहेत आणि त्यामध्ये कोणतंही कीटकनाशक वापरलेले नाहीत. या फळांची किंमत इतर फळांपेक्षा जास्त आहे.
advertisement
मात्र अनेक वेळा फळांवर बनावट स्टिकर्स लावले जातात. काही फळांवर तर फक्त ज्यावर बेस्ट क्वालिटी आणि प्रीमियम क्वालिटी लिहिलेले असते आणि त्यांना काही अर्थ नसतो. त्यामुळे असे स्टिकर पाहून फळं खरेदी करण्यापेक्षा आधी ती फळं नीट तपासून घ्या. तुम्हाला की चांगली वाटली तरच ती विकत घ्या. फळं खरेदी करण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता तपासा. त्यावर लावलेलं स्टिकर ही एक धूळफेक असू शकते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Stickers On Fruits: फळांवर असलेल्या स्टिकर्सचा अर्थ काय? ‘हे’ स्टिकर असेल तर व्हा सावध
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement