संगीताच्या ध्वनीतून मन:शांतीचा मार्ग, पल्लवी जांभोरे यांची साउंड थेरेपी अनेक आजारांवर रामबाण
- Published by:Devika Shinde
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
मनुष्य शांतता आणि विश्रांती मिळविण्यासाठी विविध प्रकारच्या थेरपींचा आधार घेतात. परंतु अशी एक थेरपी देखील आहे ज्यामध्ये आवाजाचा वापर करून शांतता प्रदान केली जाते.ज्याचा वापर आपल्या नैतिक जीवनापासून ते आरोग्यावरही अधिक समाधान कारक होऊ शकतो आणि ही म्युझिकल थेरपी नक्की काय आहे आणि ती कशी आकस्मित करावी लागते याबद्दल जाणून घेऊयात.
प्रियांका जगताप - प्रतिनीधी, मुंबई : शांततेचा शोध प्रत्येकाला असतो. काहीजण ध्यानधारणेचा आधार घेतात, तर काहीजण वेगवेगळ्या थेरपीच्या माध्यमातून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की एक अशी थेरपी आहे जिच्यामध्ये फक्त आवाजाचा वापर करून मानसिक शांतता मिळवता येते? ही थेरपी म्हणजे साउंड हिलिंग थेरपी. पल्लवी जांभोरे यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलेली ही कथा नक्कीच तुमच्याही मनाला भिडेल.
पल्लवी जांभोरे, या संगणक अभियंता असून, त्यांनी 20 वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले आहे. त्यांच्या कामाचा अनुभव नोकरी.कॉम, जीवनसाथी.कॉम, प्रॉक्टर एव्हिएशन अशा नामांकित कंपन्यांमध्ये विक्री आणि मानव संसाधन विभागाशी जोडलेला होता. परंतु, करिअरच्या या प्रवासात त्यांना ताण, वेदना, आणि मानसिक दबाव यांचा सामना करावा लागला.
पल्लवी म्हणतात, "कॉर्पोरेट जीवनातील दडपणाने मला खूपच त्रास होऊ लागला. यावर उपाय शोधण्यासाठी मी अनेक गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यातून साउंड हिलिंग थेरपी शिकण्याचा निर्णय घेतला. मला वाटलं, संगीत हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने, याचा उपयोग लोकांना तणावमुक्त करण्यात नक्कीच करता येईल."
advertisement
सुरुवातीला, पल्लवी यांनी साउंड हिलिंग थेरपीची तत्त्वे शिकून घेतली आणि त्यांच्या सत्रांमध्ये सहभागी झालेल्या लोकांवर सकारात्मक परिणाम दिसू लागले. त्यांच्या म्हणण्यानुसार, "या थेरपीमुळे ताण, चिंता, नात्यांतील ताणतणाव, आणि आत्मसंतुलनाच्या समस्यांवर आश्चर्यकारक परिणाम दिसतात. शरीरातील स्नायूंचा ताण कमी होतो, डोकं शांत राहतं, आणि व्यक्ती अधिक सकारात्मकतेने जीवन जगायला शिकते."
साउंड हिलिंग थेरपीमध्ये विशिष्ट धातूंच्या किंवा क्रिस्टलच्या वाट्यांचा वापर केला जातो. त्यांच्याद्वारे निर्माण होणारे वायब्रेशन आपल्या मनावर आणि शरीरावर सकारात्मक परिणाम करतात. गाणं गुणगुणणं, बाइन्यूरल साउंड थेरेपी, सिंगिंग बाउल्स यासारख्या पद्धतीही यामध्ये समाविष्ट आहेत.
advertisement
ही थेरपी आधुनिक वाटत असली, तरी ती प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. आज मात्र तिचा उपयोग मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी केला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2024 5:27 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
संगीताच्या ध्वनीतून मन:शांतीचा मार्ग, पल्लवी जांभोरे यांची साउंड थेरेपी अनेक आजारांवर रामबाण