कुत्रा खरेदी करताना तपासा कान, नाक, डोळे आणि आणखी एक गोष्ट, नाहीतर पस्तावाल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
कुत्रा आपल्या घरी आनंद आणि जबाबदारी दोन्ही घेऊन येतो. त्यामुळे योग्य प्रजातीचा कुत्रा पाळणं फायदेशीर ठरतं. विविध कुत्र्यांच्या जगण्याची पद्धत विविध असते.
रुपांशू चौधरी, प्रतिनिधी
हजारीबाग : कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. त्यामुळे त्याला माणसांच्या घरात स्थान मिळतं. आजकाल असंख्य घरांमध्ये कुत्रा पाहायला मिळतो. लहान शहरांपासून मोठमोठ्या शहरांमध्ये पेट शॉप असतात. जिथं जवळपास सर्व प्रकारचे कुत्रे मिळतात.
पशूवैद्य डॉ. मजरूल हसन सांगतात, घरात कुत्रा पाळणं ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. लोक आपल्या शेतातही कुत्रा पाळतात. काही लोक मित्र म्हणून कुत्रा पाळतात. तर, काही लोक सुरक्षेसाठी कुत्रा पाळतात. परंतु आपल्यासोबत एखाद्या कुत्र्याला ठेवणं म्हणजे केवळ आवड नाही, तर एक जबाबदारी असते. त्यामुळे काही गोष्टी गांभीर्यानं लक्षात घेणं आवश्यक असतं.
advertisement
बाजारातून कुत्रा खरेदी करण्यापूर्वी त्याची प्रजाती अचूक निवडायला हवी. कुत्रा आपल्या घरी आनंद आणि जबाबदारी दोन्ही घेऊन येतो. त्यामुळे योग्य प्रजातीचा कुत्रा पाळणं फायदेशीर ठरतं. विविध कुत्र्यांच्या जगण्याची पद्धत विविध असते. त्यानुसारच प्रजाती निवडावी. कुत्रा कुठूनही खरेदी केला तरी त्याचे कान, नाक, डोळे, त्वचा आणि त्वचेवरील मऊ भाग व्यवस्थित तपासावा. त्यावरून त्याला काही आजारपण असल्यास कळू शकतं.
advertisement
आपल्या बजेटनुसारच घरात कुत्रा पाळावा. काही कुत्रे पाळण्यासाठी अव्वाच्या सव्वा खर्च येतो. जर हा खर्च आपल्याला परवडला नाही, तर त्या कुत्रा पालनाला काहीच अर्थ नसतो. काही कुत्र्यांना तर दररोज व्यायामही करावा लागतो. त्यामुळे अशा कुत्र्यांना आपण वेळ देणं आवश्यक असतं. जर आपण कुत्रा घेतला आणि त्याला घरात तसंच ठेवलं, तर हा त्याच्या आरोग्याशी आपण केलेला खेळ ठरू शकतो आणि ते त्याच्या जीवावरही बेतू शकतं.
advertisement
कुत्रा विकत घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित ट्रेनिंग द्यावं, वेळोवेळी त्याचं लसीकरण करावं. काहीवेळा ट्रेनिंगच्या अभावामुळे कुत्रे आक्रमक होतात. ज्यामुळे नुकसान होऊ शकतं. तर, कुत्र्यांना योग्य वेळी योग्य लस न दिल्यामुळे आजारपण जडण्याचा धोका वाढतो, असं डॉ. मजरूल हसन यांनी सांगितलं. त्यांनी असा सल्ला दिला की, बाजारातून विदेशी प्रजातीचे कुत्रे खरेदी करण्यापेक्षा भारतीय प्रजातीचे कुत्रे पाळावे. हे कुत्रे पाळणं तुलनेनं सोपं असतं. तसंच त्यांना आजारपणाचा धोकाही कमी असतो.
Location :
Hazaribagh,Jharkhand
First Published :
February 19, 2025 4:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कुत्रा खरेदी करताना तपासा कान, नाक, डोळे आणि आणखी एक गोष्ट, नाहीतर पस्तावाल!