Duel reproductive System: ऐकावं ते नवलंच! चीनमध्ये चाललंय काय ? एक महिला झाली 2 मुलांची ‘आई’ अन् ‘बाबा’
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Woman became father and mother: चीनमध्ये एक महिला खऱ्या अर्थाने जैविकदृष्ट्या आपल्याला मुलांची ‘आई’ आणि ‘बाबा’ झालीये. त्यामुळे चीनमध्ये सुरू तरी काय आहे असा प्रश्न पडतोय.
मुंबई: घरातल्या कर्त्या पुरूषाच्या जाण्यानंतर त्या महिलेने घरची सगळी सूत्रं हातात घेऊन संसाराचा गाडा हाकणं, मुलांचं शिक्षण पूर्ण करून त्यांचं लग्न लावून देणं, त्यांचा सांभाळ करणं हे भारतीयांसाठी काही नवीन नाही. अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करताना, त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना ती महिला मुलांची आई आणि वडील दोन्ही झाली असं आपण म्हणतो. मात्र चीनमध्ये एक महिला खऱ्या अर्थाने जैविकदृष्ट्या आपल्याला मुलांची ‘आई’ आणि ‘बाबा’ झालीये. त्यामुळे चीनमध्ये सुरू तरी काय आहे असा प्रश्न पडतोय.
जाणून घेऊयात हा नेमका प्रकार काय आहे तो.
दक्षिण-पश्चिम चीनमधली एक वृद्ध महिला सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरलीय. 59 वर्षीय या महिलेत दोन प्रजनन संस्था विकसीत झाल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे 2 वेगवेगळ्या लग्नांद्वारे ही महिला एका मुलाची आई तर दुसऱ्या मुलाची बाबा झालीये. या महिलेमध्ये 2 प्रजननसंस्था आणि पुरूषांचे गुणधर्म आढळून जरी आले असले तरीही तिने अद्याप स्वत:ची ओळख एक महिला अशीच ठेवलीये.
advertisement
कोण आहे ही महिला?
चीनमधल्या बिशन प्रांतातल्या एका गावात वाढलेल्या या महिलेचं नाव लिऊ असं आहे. लिऊमध्ये लहानपणापासूनच मुलांचे गुणधर्म दिसून येत होते. त्यामुळे तीने कधीही फ्रॉक घातला नाही किंवा केसांच्या वेण्या बांधल्या नाहीत. ती मुलगी असूनही मुलांसारखीच वागत होती. मुलांच्या स्वच्छतागृहाचा वापर केला म्हणून तिला अनेकदा ओरडाही खावा लागला होता. लिऊ वयात आल्यानंतर तिच्या पालकांनी तिचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर लिऊनं मुलाला जन्म दिला.
advertisement
लिऊच्या आयुष्यातलं वादळ
मात्र मुलाच्या जन्माच्या काही वर्षातच लिऊच्या शरीरात आश्चर्यकारक बदल होऊ लागले. तिच्या शरीरात अचानकपणे एंड्रोजेनिक हार्मोन्सची वाढ झाल्यामुळे तिच्या स्तनांचा आकार कमी झाला, तिला दाढी येऊ लागली. इतकचं काय तर तिच्यामध्ये पुरूष जनेंद्रिये सुद्धा विकसीत झाली. या सगळ्या गोष्टींमुळे लिऊच्या वैवाहिक जीवनात वादळ आलं आणि अखेरीस तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला. तिच्या घटस्फोटानंतर, लिऊने तिच्या मुलाला नवऱ्याकडे ठेवण्याचा आणि नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
लिऊच्या आयुष्याला कलाटणी
घटस्फोटानंतर लिऊ दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली. तिथे तिला एका बुटांच्या कारखान्यात नोकरी मिळाली आणि तिने पुरूष म्हणून जगायला सुरूवात केली. दरम्यान लिऊची झोऊ या महिलेशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं. म्हणतात ना प्रेम आंधळं असतं असंच काहीसं लिऊ-झोऊच्या बाबतीत झालं. लिऊच्या शारीरिक व्यंगाकडे किंबहुना तिच्यात झालेल्या बदलांकडे झिऊनं दुर्लक्ष केलं आणि दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्यापुढे एक अडचण निर्माण झाली होती.
advertisement
चीनमध्ये समलैंगिकता बेकायदेशीर
आधी सांगितल्याप्रमाणे लिऊमध्ये पुरूषांची लक्षणं दिसत जरी असली तरीही ती कागदोपत्री एक महिला होती आणि चीनमध्ये समलैंगिकता हा गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर कायदेशीर अडचण निर्माण झाली होती. यानंतर लिऊने तिचा पहिला पती टँगकडे मदत मागितली. मात्र टँगने या संधीचा फायदा घेत एक वेगळाच प्रस्ताव लिऊच्या समोर ठेवला.
advertisement
लिऊच्या ऐवजी टँग झाला झिऊचा कायदेशीर पती
टँगने लिऊलां सांगितलं की पुरूष असल्याने कागदोपत्री तो झोऊशी विवाह करेल. विवाहानंतर लिऊ-झोऊ एकत्र राहू शकतील. मात्र या बदल्यात लिऊने आपल्या पहिल्या मुलाच्या देखभालीची रक्कम वाढवण्याची मागणी लिऊकडे केली. प्रेमात पडलेल्या लिऊ-झोऊकडे कोणताच पर्याय उरला नसल्याने त्यांनी टँगचा पर्याय स्वीकारला. कागदोपत्री टँग आणि झोऊ हे पती-पत्नी झाले. या लग्नाच्या काही वर्षांनंतर लिऊ-झोऊ यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. चीनसह संपूर्ण जगात लिंगबदल प्रक्रिया ही संपूर्ण प्रचंड महाग आणि गुंतागुंतीची असल्यामुळे लिऊने तो बदल केलेला नाही. लिऊ कागदोपत्री अद्यापही एक महिलाच आहे.
advertisement
अशी झाली लिऊ आई अन् बाबा
मात्र टँगपासून झालेल्या मुलाची लिऊ आई झालीये. तर झिऊ पासून झालेल्या मुलाची लिऊ ही बाबा झालीये. त्यामुळे लिऊ ही खऱ्या अर्थांने शास्त्रिय दृष्ट्या आई आणि बाबा अशी दोन्ही झालीये.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 07, 2025 4:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Duel reproductive System: ऐकावं ते नवलंच! चीनमध्ये चाललंय काय ? एक महिला झाली 2 मुलांची ‘आई’ अन् ‘बाबा’


