Happy Women's Day 2024 Wishes Marathi : तुमच्या आयुष्यातील खास महिलांना द्या आंतरराष्ट्रीय महिला शुभेच्छा..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Women's Day 2024 : तुम्ही तुमची आई, बहीण, मैत्रीण, कार्यालयीन सहकारी किंवा तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीला या दिवशी भेटवस्तू देऊन आणि त्यांना 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'निमित्त शुभेच्छा संदेश (Womens Day Wishes In Marathi) पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
मुंबई : दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील सर्व महिलांचा समाज, घर आणि कुटुंबातील महत्त्व आणि योगदानाबद्दल सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'च्या दिवशी तुम्हीही तुमच्या आयुष्यातील खास महिलांना खास फील करून देऊ शकता. ज्यांच्याबद्दल तुम्हाला आदर आणि प्रेम आहे त्यांच्याशी तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर महिला दिन हा सर्वोत्तम दिवस आहे.
तुम्ही तुमची आई, बहीण, मैत्रीण, कार्यालयीन सहकारी किंवा तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीला या दिवशी भेटवस्तू देऊन आणि त्यांना 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'निमित्त शुभेच्छा संदेश (Womens Day Wishes In Marathi) पाठवून शुभेच्छा देऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही व्हॉट्सॲप, फेसबुकवर शेअर करू शकता.
स्त्रिया कमकुवत आहेत असे जग का म्हणते?
advertisement
आजही संपूर्ण घर चालवण्याची ताकद महिलांच्या हातात आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्त्रीला घर नसते असे काही लोक का म्हणतात?
सत्य हे आहे की स्त्री जिथे असते
तिथे घर असते आणि स्वर्गही असतो.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई, आज मी जे काही आहे ते
फक्त तुझ्यामुळेच आहे,
तू माझ्या आयुष्याची प्रेरणा आहेस..
advertisement
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Int Womens Day Wishes In Marathi)!

आजच नाही तर
प्रत्येक दिवस महिलांच्या नावाने असावा
कारण त्या न थांबता सर्व कामं करतात.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कधी ती आई असते, कधी मुलगी असते, कधी बहीण-पत्नी असते,
advertisement
ती आपल्या आयुष्यातील सर्व सुख-दु:खात सहभागी असते,
ती आपल्या सर्वांची ताकद असते आणि ती एक प्रेरणा असते,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आम्हाला साथ देणाऱ्या
सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Womens Day Quotes In Marathi)!
विश्व आहे,
ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
आणि केवळ ती आहे,
advertisement
म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे..
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व सारे वसावे..
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चौकटीतून बाहेर पडून,
शत्रूंच्या नजरेला नजर भिडवून,
उभ्या ठाकणाऱ्या रणरागिणींना
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज जागतिक महिला दिनानिमित्त
advertisement
सगळ्या माझ्या बहिणींना, युवतींना,
विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,
शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या
माझ्या कष्ट करणाऱ्या बहिणींनाही
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच
मला जग जिंकल्याचा भास होतो.
तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2024 7:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Happy Women's Day 2024 Wishes Marathi : तुमच्या आयुष्यातील खास महिलांना द्या आंतरराष्ट्रीय महिला शुभेच्छा..










